तूर उत्पादन वाढीसाठी पंचसूत्रीचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:21+5:302021-07-04T04:16:21+5:30
यावेळी पंचायत समिती सदस्य आनंद सोनकांबळे, माजी नगरसेवक किरण केसुर, मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर आदी ...
यावेळी पंचायत समिती सदस्य आनंद सोनकांबळे, माजी नगरसेवक किरण केसुर, मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर आदी उपस्थित होते.
डॉ. इंडी म्हणाले, तूर उत्पादन वाढीसाठी योग्य वाणाची निवड करणे, बीज प्रक्रिया करणे, संतुलित खताचा वापर करणे, योग्य वेळी शेंडे खुडणे व एकात्मिक कीड रोग नियंत्रण या पाच सुत्राचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. इंडी यांनी केले. गावोगावी बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
त्यावेळी मैंदर्गी, मुगळी, बोरोटी, संगोळगी येथील शेतकरी उपस्थित होते. शेतकरी तुकाराम म्हेत्रे यांच्या शेतावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी प्रास्ताविक केले. कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. मंडल अधिकारी संकेत धुमाळ यांनी आभार मानले.
----
फोटो : ०२ अक्कलकोट कृषी
ओळ : मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोपप्रसंगी डॉ. देवेंद्र इंडी, कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर.