अत्याधुनिक साधनांचा चिन्हांमध्ये वापर फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:22 AM2021-01-03T04:22:54+5:302021-01-03T04:22:54+5:30

चिन्हवाटपात लक्षवेधी चिन्ह आपल्याला मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ झाल्यामुळे उमेदवारांना १९० ...

The use of sophisticated tools in symbols is beneficial | अत्याधुनिक साधनांचा चिन्हांमध्ये वापर फायदेशीर

अत्याधुनिक साधनांचा चिन्हांमध्ये वापर फायदेशीर

Next

चिन्हवाटपात लक्षवेधी चिन्ह आपल्याला मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ झाल्यामुळे उमेदवारांना १९० मुक्त चिन्हांचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर येत्या ४ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यानंतर चिन्हवाटप होऊन प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हात चांगलीच वाढ केली आहे. पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या चिन्हामधून प्राण्यांना वगळले असून, इतर प्रत्येकाच्या वापरातील वस्तू आता चिन्हस्वरूपात भेटीला आल्या आहेत. १९० निवडणूक चिन्हांमध्ये आधुनिकता दिसून येत आहे.

आबालवृद्धांच्या हाती असलेल्या मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा यात समावेश केल्याने उमेदवारांना चिन्हांचे भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिन्हांची यादी प्रसिद्ध करताना उमेदवारांना त्यात अनेक पर्याय दिले आहेत. त्यास आधुनिकतेची जोड दिली आहे.

अशी असणार चिन्हे

मुक्त चिन्हांमध्ये लोकरीचा गुंडा व सुई, खिडकी, पवनचक्की, शेतीशिट्टी, विहीर, पाण्याची टाकी, कलिंगड, अक्रोड, पाकीट, चालण्याची काठी, व्हायोलिन, व्हॅक्युम क्लिनर, छत्री, टायर्स, टाइपरायटर, तुतारी, बिगुल, ट्रॅक्टर, दातांची पेस्ट, दातांचा ब्रश, चिमटा, नांगर, भालाफेक करणारा, तंबू, दूरदर्शन संच, दूरध्वनी, चहाची गाळणी, टॅक्‍सी, टेबल, टेबल लॅम्प, टीव्ही रिमोट, इंजेक्शन, स्विच बोर्ड, झोका, सूर्यफूल, स्टॅम्प, स्टूल, स्टेथोस्कोप, स्टेपलर, पाना, सोफा, मोजे, साबण, पाटी, दोरी उडी, सितार, शटर, बोट, शिवणयंत्र, स्कूटर, कात्री, शाळेची बॅग, करवत, रबरी शिक्का, एअर कंडिशनर, रोड रोलर, फ्रिज, सेफ्टी पिन, अंगठी, रॅकेट, पंचिंग मशीन, घागर, जेवणाची थाळी, प्लास्टर थापी, अननस, फोन चार्जर, पेट्रोल पंप, उशी, खलबत्ता, पेन्सिल शार्पनर, कंपासपेटी, पेन स्टँड, पेन ड्राईव्ह, वाटाणे, पेरू, भुईमूग, कढई, गळ्यातील टाय, नेलकटर, नगारा, मिक्सर, माईक, काड्यापेटी, मका, जेवणाचा डबा, लुडो, पत्रपेटी, कडी, लॅपटॉप, भेंडी, चावी, किटली, जग, फणस, इस्त्री, हिटर, आइस्क्रीम, वाळूचे घड्याळ, हॉकी, हेल्मेट, हेलिकॉप्टर, हेडफोन, हार्मोनियम, हॅट, हातगाडी, हिरवी मिरची, हार्मोनियम, द्राक्षे, चष्मा, काचेचा प्याला, आले, गॅस सिलिंडर, ऊस, नरसाळे, काटा फुटबॉल, बासरी, एक्स्टेन्शन बोर्ड, लिफाफा, विद्युत खांब, कानातील दागिने, डंबेल्स, ड्रिल मशीन, दरवाजांची मूठ, दरवाजांची घंटी, ठोकळा, संगणक, संगणकाचा माऊस, कंगवा, नारळ, बुद्धिबळ, पोळपाट-लाटणे, जाते, छताचा पंखा, सीसीटीव्ही कॅमेरा, कॅमेरा, फुलकोबी, गणकयंत्र, खटारा, कॅरमबोर्ड, ढोबळी मिरची, पुस्तक, होडी, बादली, फळा, बिस्कीट, दुर्बीण, ब्रिफकेस, मण्यांचा हार, बॅटरी, बॅट, रिक्षा, टोपली, फुगा, ऑटो रिक्षा, सफरचंद, कपाट या चिन्हांचा समावेश आहे.

Web Title: The use of sophisticated tools in symbols is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.