उजनीने कमालीची पातळी गाठल्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:52 AM2019-05-28T11:52:28+5:302019-05-28T11:54:42+5:30

दुष्काळाची दाहकता; पळसनाथ मंदिर पाण्याबाहेर : १० व्या शतकातील मंदिर पाण्यात राहूनही शाबूत

Uyuni reached the level of historical significance because of the historical sights | उजनीने कमालीची पातळी गाठल्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन

उजनीने कमालीची पातळी गाठल्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळामुळे उजनी पात्रातील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्यातून बाहेर आलेपुणे जिल्ह्यातील पळसनाथ मंदिर व सोलापूर जिल्ह्यातील ईनामदार वाडा ही उजनी धरणातील पर्यटन केंद्रेचमंदिराच्या संपूर्ण बाजूला दगडाची तटबंदी आहे. परंतु त्याची पडझड झालेली आहे.

प्रदीप पाटील
भीमानगर : दुष्काळामुळे उजनी पात्रातील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्यातून बाहेर आले आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावातून आत उजनीच्या पात्राकडे ३ किमीच्या आसपास गेले की पुणे-सोलापूर हायवेवरून हे मंदिर दिसते. टेंभुर्णीपासून सुमारे ३५ किमी अंतरावर हे मंदिर आहे तर सोलापूरपासून १२५ किमी अंतर आहे.

मंदिरात जायचे झाल्यास छोट्याशा होडीनेच जावे लागते. होडीत बसल्यानंतर आपण जसजसे मंदिराच्या जवळ जातो तसतसे ते मंदिर आपल्याला अजूनच आकर्षित करत राहते. त्याची भव्यता आपल्याला दिसायला लागते. हे मंदिर हेमाडपंथी असून सुमारे १० व्या शतकातील आहे.

संपूर्ण मंदिर मोठमोठे दगड, शिळा, पक्क्या विटा, चुना आणि त्यावर नक्षीकाम करून हे मंदिर बनवले आहे. यामुळे हे मंदिर बघताना तुम्हाला खूप साºया इतिहासातील गोष्टी पाहायला मिळतील. भीमा नदीचे पाणी या मंदिराला येऊन धडकत असते. त्यानंतर उजनी जसजसे भरत जाईल तसे हे मंदिर पाण्याखाली जाते.

मंदिरात चौकोनी खांब, वर्तुळाकार पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंचशाखा सुस्थितीत दिसून येतात. शिल्प मूर्तींमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर-पार्वती, तीन वीरगळी, रामायण-महाभारतकालीन कलाकृती, इंद्राच्या दरबारात असणाºया देवीदेवतांची शिल्पे, त्या काळातील अप्रतिम कोरीव काम, जडणघडण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गाभाºयासमोर नंदी आहे. 
गेली अनेक वर्षे हे मंदिर पाण्याखाली असून देखील चांगल्या स्थितीत आहे. हा प्राचीन वास्तू कलेचा हा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या संपूर्ण बाजूला दगडाची तटबंदी आहे. परंतु त्याची पडझड झालेली आहे.

पाण्याबाहेरच्या वास्तूंमुळे पर्यटकांमध्ये वाढ
- पुणे जिल्ह्यातील पळसनाथ मंदिर व सोलापूर जिल्ह्यातील ईनामदार वाडा ही उजनी धरणातील पर्यटन केंद्रेच झाली असून मोठा दुष्काळ पडला की धरण पातळी खोलवर जाते व या ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणांना भेटी देतात.

Web Title: Uyuni reached the level of historical significance because of the historical sights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.