पहिल्याच दिवशी दिली शंभर जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:28+5:302021-01-18T04:20:28+5:30
अक्कलकोट : येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभागातील कर्मचा-यांना कोरोना लसी देण्यात आली. याची सुरुवात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य ...
अक्कलकोट : येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभागातील कर्मचा-यांना कोरोना लसी देण्यात आली. याची सुरुवात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाली. शनिवारी सकाळी ९ वाजता या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत एका दिवसात शासनाने ठरवून दिलेल्या १०० जणांचे उद्दिष्ट् पूर्ण करण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक राठोड यांनी सांगितले.
तालुक्यात आरोग्य विभागाचे एकूण १ हजार १५८ कर्मचारी आहेत. प्रत्येक दिवशी १०० लोकांना लस दिली जाणार आहे. त्यांची संख्या पूर्ण होण्यास तब्बल १२ दिवस लागणार आहे. आता दिलेल्या व्यक्तींना पुन्हा २८ दिवसांनी आणखीन एक लस दिली जाणार आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात ९४० लस उपलब्ध आहेत. ही लस ३२० कर्मचा-यांना पुरणार आहे. आणखीन लसींची गरज आहे. याप्रसंगी एकाही कर्मचा-यांना त्रास झाला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी सांगितले. यावेळी सीईओ यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सरिता बागडे, गटविकास अधिकारी महादेव कोळी, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाढ, डॉ. निखील क्षीरसागर, डॉ. नीरज जाधव, विस्तार अधिकारी महेश भोरे, सेविका ग्रेस काकडे उपस्थित होते.
---
इस्मोद्दीन काझी ठरले पहिल्या लसीचे मानकरी
अक्कलकोट तालुक्यात पहिली लस ही आरोग्य सेवक ईस्मोद्दीन काझी यांना देण्यात आली. शनिवारी लस दिलेल्या कोणत्याही कर्मचा-यांना त्रास झाला नाही. दुसऱ्या टप्प्यात कोमोरबीड रुग्णांना ,पोलीस कर्मचारी यांना तर त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच जसजशी लस उपलब्ध होईल तसतशी वितरीत होणार आहे.
---
फोटो : १७ अक्कलकोट १, २
१) अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचा-यांना कोरोना लस देण्यापूर्वी मार्गदर्शन करताना सीईओ दिलीप स्वामी. यावेळी डॉ अशोक राठोड, डॉ अश्विन करजखेडे, डॉ.क्षीरसागर, डॉ जाधव,
२)तालुक्यात पहिला लस आरोग्य कर्मचारी इस्मोद्दीन काझी याना देताना