एकाच दिवशी १३७८ महिलांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:47+5:302021-08-25T04:27:47+5:30
बार्शी : रक्षाबंधननिमित्ताने केवळ महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये एकाच दिवशी १३७८ महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तालुक्यात ...
बार्शी : रक्षाबंधननिमित्ताने केवळ महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये एकाच दिवशी १३७८ महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी लसीकरण करण्यात आले असून, तालुक्यात आजपर्यंत लस घेणाऱ्यांची संख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधून बार्शी तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३५ केंद्रांतून फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत गरोदर आणि स्तनदा मातांसाठी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून रांगेत न थांबता थेट लसीकरणाची सोय करण्यात आली होती.
---
लसीकरणात बार्शी तालुका प्रथम क्रमांकावर
आत्तापर्यंत १,०८,९७९ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ५७,७५८ पुरुषांचा, तर ५२,२२१ महिलांचा समावेश आहे. या विशेष लसीकरण मोहिमेमुळे तालुक्याच्या आरोग्य सुधारणेत फायदा होणार असून, यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेस आळा घालण्यास मदत होणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .अशोक ढगे यांनी सांगितले.
-----