ग्रामसेवकाच्या स्लिपा न घेता ३८ जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:33+5:302021-05-16T04:20:33+5:30
सुस्ते गावची लोकसंख्या ५,५०६ आहे. १४ मार्च रोजी पंढरपूर तालुक्यातील हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. या गावात ...
सुस्ते गावची लोकसंख्या ५,५०६ आहे. १४ मार्च रोजी पंढरपूर तालुक्यातील हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. या गावात दिवसेंदिवस १० रुग्ण आढळत आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस ही बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी घेतली आहे. बाधित आणि मृत्युदर पाहता लस घेण्यासाठी वयोवृद्धांची धावपळ सुरू आहे.
दरम्यान, १३ मे रोजी सुस्ते येथे लसीकरण मोहीम असल्याचे समजताच, गावातील वयोवृद्ध नागरिकांनी लस मिळण्याच्या आशेने ग्रामपंचायतीसमोर गर्दी केली होती. मात्र, या ठिकाणी पोलीस पाटील यांचे पती आले आणि लसीसाठी आलेल्या वयोवृद्धांची गर्दी हटली.
--
लस सर्वांसाठी महत्त्वाची आहे. माझ्याकडून स्लिपा न घेता ३८ जणांना लस दिली गेली आहे.
- विष्णू गवळी, ग्रामविकास अधिकारी, सुस्ते.
--
ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांच्या पतीला हाताशी धरून लसीसाठी थांबलेल्या वयोवृद्धांना परत पाठविले. ग्रामसेवकाचे टोकन न घेता ३८ जणांना लस दिली.
- तानाजी रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते
--
पोलीस पाटलांचे पती, उपसरपंच, सरपंच पती यांनी बळाचा वापर करून ग्रामसेवकाचे टोकन न घेता, सुस्ते येथील ३८ जणांना लस दिली आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
- भय्या फडतरे, आरपीआय, रोपळे गट प्रमुख.
--
मी लसीकरण केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटिंग करत होतो. ३८ पैकी एकानेही लस घेण्याअगोदर ग्रामसेवकाचे टोकन दिले नाही.
- अजिंक्य वाघमारे, कॉम्प्युटर ऑपरेटर, सुस्ते.