करकंब ग्रामीण रुग्णालयात एका दिवसात ८५५ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:54+5:302021-09-05T04:26:54+5:30
करकंब ग्रामपंचायतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करीत, करकंब ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत पोलीस स्टेशन, ...
करकंब ग्रामपंचायतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करीत, करकंब ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत पोलीस स्टेशन, आशा वर्कर, प्रशासकीय विभागाने कोरोनावर प्रभावीपणे मात करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी करकंब हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक होते. त्याप्रमाणे १ सप्टेंबर रोजी करकंब ग्रामीण रुग्णालयात विक्रमी ८५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी रक्षाबंधनदिवशी २०० महिलांचे लसीकरण केले होते. गेल्या ४ दिवसांत २१८२ जणांचे लसीकरण केले आहे. या लसीकरणासाठी करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सरवदे, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, आशा वर्कर, सरपंच तेजमाला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी, करकंब पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पदाधिकारी, आजी-माजी सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे सदस्य यांनी सहकार्य केले.