डोणगावात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:58+5:302021-04-30T04:27:58+5:30
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील आरोग्य उपकेंद्र आणि डोणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित केलेल्या कोरोना प्रतिबंध ...
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील आरोग्य उपकेंद्र आणि डोणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित केलेल्या कोरोना प्रतिबंध लसीकरणास सुरुवात करण्यात आली. डॉ. सुनयना हाळनोर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोडसे, सी.एच.ओ. अमृता धावरे, पर्यवेक्षिका सीमला सोनकांबळे, काशीनाथ जाधव, जानकी गोगी, सुनीता कत्ते, आरोग्यसेवक अतुल अलकुंटे, सरपंच संजय भोसले, ग्रामसेवक मारुती कांबळे, आशा वर्कर मनीषा हक्के, मीना कुंभार, अंगणवाडीसेविका रंजना रसाळ, जीवन गुंड, चंद्रकांत बनसोडे उपस्थित होते. यावेळी ४५ वर्षांवरील व कोमाबीड आणि ६० वर्षांवरील जवळपास १०० व्यक्तींना लस देण्यात आली. या शिबिरासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे, वजीर शेख, बाबा आमले, नागनाथ चराटे, प्रमोद चराटे, बाबा मोहिते, बन्सी मेटे, नाना शिंगाडे, गोपीचंद चौगुले यांनी परिश्रम घेतले.
---
२९ डोणगाव
डोणगाव आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.