लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर; लसींचा साठा संपल्याने केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:33+5:302021-07-07T04:27:33+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार १०१ जणांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला, तर १ लाख ४७ हजार ५९० नागरिकांनी ...
आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार १०१ जणांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला, तर १ लाख ४७ हजार ५९० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून ७ लाख ३५ हजार ६९१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात बार्शी तालुक्यात (२६.५० टक्के) सर्वाधिक लसीकरण झाले आहे, तर मोहोळ व सांगोला तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वांत कमी लसीकरण झाले आहे. मोहोळ तालुक्यात १ लाख ९८ हजार ११९, सांगोला तालुक्यात २ लाख ३० हजार ९७७ नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम खोळंबली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पहिल्या डोससाठी १८ ते ४४ वर्षांच्या आतील, तर ज्यांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, असे नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात लसीकरण झालेल्यांची संख्या
पहिला आणि दुसरा डोस मिळून ७ लाख ३५ हजार ६९१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ४५ वर्षांपुढील ५ लाख ८८ हजार १०१ नागरिकांना पहिला, तर १ लाख ४७ हजार ५९० नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ०९ हजार ०१८ पुरुष, तर ३ लाख २६ हजार ५९२ महिलांना लसीकरण केले आहे. ७ लाख १२ हजार २७३ जणांना कोविशिल्ड, तर २३ हजार ४१८ कोव्हॅक्सिन लस दिली आहे. १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ८६ हजार ३७२ नागरिक, ४५ ते ६० वयोगटातील २ लाख ८९ हजार ४०४ नागरिक, तर ६० वर्षांच्या पुढील २ लाख ५९ हजार ९१५ नागरिकांचे लसीकरण केले आहे.
कोट :::::::::::::::
आजच ३० हजार कोविशिल्ड लस प्राप्त झाली आहे. यापूर्वी ३० हजार लाभार्थ्यांपैकी २२ हजार लाभार्थ्यांना लस टोचून झाली आहे. दुसरा डोसमधील ८ हजार नागरिक व १८ ते ४५ आतील तसेच पुढील नागरिकांना लस दिली जाईल. जिल्हास्तरावरून गावच्या लोकसंख्येनिहाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना लस वाटप केली जाईल.
- डॉ. अनिरूद्ध पिंपळे
जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, सोलापूर