दक्षिण सोलापूर तालुक्यात ३१ केंद्रांत लसीकरणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:37+5:302021-04-07T04:22:37+5:30
तालुक्यात मंद्रूप येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालय, बोरामणी, होटगी, वळसग, औराद, कंदलगाव आणि भंडारकवठे या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांत, ...
तालुक्यात मंद्रूप येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालय, बोरामणी, होटगी, वळसग, औराद, कंदलगाव आणि भंडारकवठे या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांत, बरूर येथील आयुर्वेदिक दवाखान्यात आणि २३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील नागरिक याचा लाभ घेत आहेत. परिसरातील नागरिकांनी आवर्जून या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
-------
या उपकेंद्रात लस उपलब्ध
निंबर्गी, भंडारकवठे, कुसूर, विंचूर, हत्तूर, टाकळी, बरुर, माळकवठे, अंत्रोळी, आचेगाव, धोत्री, कुंभारी १, कुंभारी २, लिंबीचिंचोळी, मुस्ती, मुळेगाव, मुळेगावतांडा, कासेगाव, इंगळगी, कणबस (ग), मद्रे, आहेरवाडी, दरगंहळ्ळी या २३ उपकेंद्रांत लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
----