छत्रपतींचा पुतळा बसविण्यावरुन धुमश्चक्री; ग्रामीण पोलिसांचा लाठीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:42 AM2021-02-08T11:42:19+5:302021-02-08T11:43:53+5:30

वैरागमध्ये संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव, वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना

In Vairag, an angry mob surrounded the police station and sent a senior police officer | छत्रपतींचा पुतळा बसविण्यावरुन धुमश्चक्री; ग्रामीण पोलिसांचा लाठीहल्ला

छत्रपतींचा पुतळा बसविण्यावरुन धुमश्चक्री; ग्रामीण पोलिसांचा लाठीहल्ला

googlenewsNext

वैराग/सोलापूर : प्रशासनाची परवानगी न घेता शासकीय जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा दहा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा बसविल्यानंतर बार्शी तालुक्यातील वैराग येथे पोलीस आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला. संतप्त जमाव पोलीस ठाण्यासमोर जमल्यानंतर पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. घटनेत दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वैराग येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पहाटे बसविल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीला पांगविले. बळाचाही वापर केला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सभापती मकरंद निंबाळकर, माजी तालुका पंचायत सदस्य निरंजन भुमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच संजय भुमकर यांना पोलिसांनी चौकशी करण्याकरिता सकाळी ठाण्यात बोलाविले होते.

यावेळी राजकीय लोकप्रतिनिधी व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. गोंधळ वाढताच ग्रामस्थांनी 'पोलीस अन्याय करत आहेत,' असे समजून पोलीस स्टेशनलाच घेरावा घातला. यावेळी जमावाला पांगविताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
  या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिया करीत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.

Web Title: In Vairag, an angry mob surrounded the police station and sent a senior police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.