वैराग ग्रामीण रुग्णालयाला लवकरच मंजुरी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:26 AM2021-08-27T04:26:24+5:302021-08-27T04:26:24+5:30

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रयत्नांमुळे वैराग ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळत आहे. सन २००३ मध्ये जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ...

Vairag Rural Hospital will get approval soon | वैराग ग्रामीण रुग्णालयाला लवकरच मंजुरी मिळेल

वैराग ग्रामीण रुग्णालयाला लवकरच मंजुरी मिळेल

Next

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रयत्नांमुळे वैराग ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळत आहे. सन २००३ मध्ये जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असताना सोपन यांनी वैराग येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली. त्यानंतर तो प्रस्ताव पुणे येथील आरोग्य उपसंचालकाकडे पडून होता. वैराग येथील अमरराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा करून राहिलेल्या त्रुटींची पूर्तता केली. त्यानंतर जानेवारी महिन्यात हा प्रस्ताव आरोग्य सचिवाकडे आला होता. नुकतेच दिलीप सोपल यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन मंजुरी मिळविली आहे. आता प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला असून त्यास लवकरच मंजुरी मिळेल, सावंत यांनी सांगितले. यावेळी प्रवीण काकडे, समीर शेख, समाधान पवार, शलाका मरोड, प्रवक्ते आनंद गवळी, आबासाहेब देवकर, मारुती जिरंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Vairag Rural Hospital will get approval soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.