वैशाली शिरशेट्टी यांची तडकाफडकी बदली गर्भपात प्रकरण

By Admin | Published: May 11, 2014 01:10 AM2014-05-11T01:10:57+5:302014-05-11T01:10:57+5:30

: आयुक्तांनी दिले आदेश

Vaishali Shirishetty's Tough Change Abortion Case | वैशाली शिरशेट्टी यांची तडकाफडकी बदली गर्भपात प्रकरण

वैशाली शिरशेट्टी यांची तडकाफडकी बदली गर्भपात प्रकरण

googlenewsNext

 

सोलापूर : बेकायदा गर्भपात प्रकरणात कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या कुटुंबकल्याण विभागप्रमुख डॉ. वैशाली शिरशेट्टी यांची आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बॉईज हॉस्पिटल येथे बदली करून त्यांच्या जागी डॉ. दर्शना गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात केला अशी तक्रार डॉ. अजित गांधी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली होती. त्यावरून सनराईज हॉस्पिटलचे डॉ. संदेश कादे यांना नोटीस देण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी कुटुंबकल्याण विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी केली होती ;मात्र त्यांनी दरम्यानच्या तत्काळ पोलिसात फिर्याद न देता आपल्या कामात कसूर केली होती. या बाबत आयुक्तांनी केलेल्या चौकशीत डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी वेळेत आपले कर्तव्य न बजावता डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने ठेवला होता मात्र त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. 

Web Title: Vaishali Shirishetty's Tough Change Abortion Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.