पंढरपूरातील वाखरी बाजारतळ फुलला, ३ हजार जनावरे दाखल, १० कोटींपेक्षा जास्त उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:38 AM2017-10-30T11:38:54+5:302017-10-30T11:44:21+5:30

राज्यभर झालेला समाधानकारक पाऊस, चाºयाची मुबलक उपलब्धता यामुळे पंढरीतील कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांच्या बाजारात तीन हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली असून, १० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे यांनी वर्तविली आहे़ 

Vakhri market full of Pandharpur, 3 thousand animals filed, more than 10 crores turnover | पंढरपूरातील वाखरी बाजारतळ फुलला, ३ हजार जनावरे दाखल, १० कोटींपेक्षा जास्त उलाढाल

पंढरपूरातील वाखरी बाजारतळ फुलला, ३ हजार जनावरे दाखल, १० कोटींपेक्षा जास्त उलाढाल

Next
ठळक मुद्देशुपालकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणीपुरवठा व्यवस्थाजनावरांसाठी दवाखानाही उभारण्यात आलाखिलार गायी, खोंड, बैल, म्हशी अशी सुमारे तीन हजार जनावरे दाखल


सचिन कांबळे
पंढरपूर दि ३० : राज्यभर झालेला समाधानकारक पाऊस, चाºयाची मुबलक उपलब्धता यामुळे पंढरीतील कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांच्या बाजारात तीन हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली असून, १० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे यांनी वर्तविली आहे़ 
वाखरी येथील पालखी तळावर गेल्यावर्षीपासून जनावरांचा बाजार सुरू झाला़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पशुपालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत़
शेकडो वर्षांची परंपरा असलेला पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरांचा बाजार गतवर्षीपासून वाखरी येथील पालखी तळावर हलविण्यात आला आहे़ हवेशीर, मोकळे पटांगण, झाडांची सावली व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यामुळे व्यापाºयांसह पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात या बाजारात हजेरी लावली आहे़ खिलार गायी, खोंड, बैल, म्हशी अशी सुमारे तीन हजार जनावरे दाखल झाली असून आणखी दोन दिवस आवक वाढणार आहे़ रविवारी सांगोला येथील जनावरांचा बाजार संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे़ 
पालखी तळावर बाजार समितीच्या वतीने चार ठिकाणी जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणीपुरवठा व्यवस्था केली आहे तर सहा ठिकाणी पाण्याचे टँकर उभारण्यात आले आहेत़ जनावरांसाठी दवाखानाही उभारण्यात आला आहे़ त्यांच्या मदतीला अ‍ॅनिमल                 राहत या संस्थेचे डॉक्टर आणि  खासगी डॉक्टरांचे पथक उपलब्ध   आहे़ 
---------------------
पशुपालकांची सोय
यात्रेसाठी आलेल्या पशुपालकांची सोय करण्याच्या दृष्टीने रस्त्यालगत हॉटेल, पानटपरी, जनावरे सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत़ रस्त्यावरील वाहतुकीस अडथळ होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे़ जनावरांच्या गर्दीत कोणताही अपघात होऊ नये, यासाठी आवश्यक तेथे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे़

Web Title: Vakhri market full of Pandharpur, 3 thousand animals filed, more than 10 crores turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.