एटीएमची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटली, सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 02:48 PM2017-11-01T14:48:53+5:302017-11-01T14:49:08+5:30
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी व्हॅन अज्ञात चोरट्यांनी लुटली़ सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून ७० लाख रूपयांची रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आ
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी व्हॅन अज्ञात चोरट्यांनी लुटली़ सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून ७० लाख रूपयांची रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आहे़ ही घटना सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ घडली आहे़
याबाबत पोलीसांकडून समजलेली प्राथमिक माहिती अशी की, बँक आॅफ इंडिया या बँकेची व्हॅन सांगोला तालुक्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी पंढरपूरहून निघालेली होती़ ही गाडी सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ आली असता अज्ञात चोरट्यांनी बेलेरो गाडीत येऊन पैसे घेऊन जाणाºया व्हॅनच्या समोर आडवी लावली़ यानंतर गाडीत असलेल्या सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून गाडीतील ७० लाख रूपये लुटले़ रक्कम लुटल्यानंतर चोरटे पंढरपूरच्या दिशने पसार झाल्याची माहिती समोर आली आहे़ या घटनेनंतर ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली आहे़ चोरट्यांच्या तपासासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत़