वंचितच्या उमेदवाराचं 'मिशन (शुभ)मंगल'; म्हणाले, तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:15 PM2024-04-01T17:15:06+5:302024-04-01T17:20:17+5:30

माढा लोकसभामध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे, माढा लोकसभा मतदारसंघातून वंचित'ने रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

Vanchit's candidate Ramesh Baraskar has said that he will work on the issue of youth marriage | वंचितच्या उमेदवाराचं 'मिशन (शुभ)मंगल'; म्हणाले, तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार!

वंचितच्या उमेदवाराचं 'मिशन (शुभ)मंगल'; म्हणाले, तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार!

माढा लोकसभा मतदार संघात महायुतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीमध्ये नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. माढा लोकसभामध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे, माढा लोकसभा मतदारसंघातून वंचित'ने रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

आज वंचित बहुजन आघाडीच्या रमेश बारसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बारसकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माढा मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, महिलांच्या हाताला काम नाही. तरुण मुलांच्या लग्नाचं वय झालेलं असताना देखील लग्न होतं नाहीत. हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातील आहे. या प्रश्नावर मी काम करणार आहे, असंही वंचित'चे रमेश बारसकर म्हणाले. 

"कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास"; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत..

"माढा मतदारसंघात एससी, ओबीसी, धनगर समाज मतदार आहेत. आता ओबीसी मतदार जागा झाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील ओबीसी समाज पाठिंबा देईल ही अपेक्षा आहे, असंही बारसकर म्हणाले. 

रमेश बारसकर म्हणाले, माढ्यात भाजपालाही फटका बसणार आहे. वंचितचा पहिला गुलाल माढा लोकसभा मतदारसंघातून असेल. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून  जाहीर भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज निवडणुकीची वाट पाहत होता, आता येणाऱ्या निवणुकीत ओबीसी समाजाची दाकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही बारसकर म्हणाले. 

माढ्यात शरद पवार यांची नवी खेळी!

भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी अद्यापही राजी नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जात आहे. 

रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे माढा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या उमेदवारीला विरोध करत अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपसले आहे. यातूनच मोहिते-पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते. 

Web Title: Vanchit's candidate Ramesh Baraskar has said that he will work on the issue of youth marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.