सोलापूरची वरदायिनी; पुण्यातील धरणांमुळे ४० वर्षांत ३४ वेळा भरले उजनी धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 02:45 PM2020-09-14T14:45:26+5:302020-09-14T14:46:51+5:30

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी 

Vardayini of Solapur; Due to dams in Pune, Ujani dam has been filled 34 times in 40 years | सोलापूरची वरदायिनी; पुण्यातील धरणांमुळे ४० वर्षांत ३४ वेळा भरले उजनी धरण

सोलापूरची वरदायिनी; पुण्यातील धरणांमुळे ४० वर्षांत ३४ वेळा भरले उजनी धरण

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहेउजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोºयात आॅगस्ट महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरल्याने या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ४० वर्षांत ३४ व्या वेळेस तुडुंब भरले. गेल्यावर्षी आॅगस्टच्या सुरुवातीस शंभर टक्के भरलेले उजनी धरण यंदा मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीस शंभर टक्के भरले आहे.

सोलापूरसहपुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी एवढी प्रचंड आहे. धरण जेव्हा शंभर टक्के भरले असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले तेव्हा १२३ टीएमसी साठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण आहे. तसेच राज्यातील तिसºया क्रमांकाचा उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. 

उजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहे. उजनी धरणाचा उपयोग फक्त सिंचनासाठीच नाही तर या धरणातील पाण्याचा उपयोग विद्युत निर्मिती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय तसेच पूर नियंत्रणासाठी केला जातो. म्हणूनच धरण बहुउद्देशीय आहे. उजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते तर धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. वाढलेल्या ऊस उत्पादनामुळे जिल्ह्यात तब्बल ४० साखर कारखाने उभारण्यात आले. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तुडुंब भरलेल्या या धरणाच्या पाण्याचा वापर नियोजनबद्ध व्हायला हवा अशी मागणीही होऊ लागली आहे. 

पुण्याच्या पश्चिम भागामुळे धरण भरते तुडुंब
7377 चौरस मैल उजनी धरणात एवढे प्रचंड पाणलोट क्षेत्र लाभले असून सोलापूर जिल्ह्यात थोडाही पाऊस पडला नाही तरी पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे हे धरण अनेक वेळा तुडुंब भरलेले आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उसाची शेती वाढण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून नेहमीच उजनीचा उल्लेख केला जातो. 

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी 
पूर्वी बारमाही असलेले उजनी धरण सध्या ८ माही करण्यात आले आहे.४० वर्षांत ३४ वेळा उजनी धरण शंभर टक्के भरले असले तरी नियोजनाअभावी ते तेवढ्याच वेळा रिकामेही झाले आहे. ढिसाळ नियोजनामुळे शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या असून आंदोलनही करावे लागले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गळतीच्या व बाष्पीभवनाच्या नावाखाली अनेकवेळा जलशयातील १६ ते १८ टीएमसी पाणी वेगवेगळ्या मार्गाने पळवले जाते ही वस्तुस्थिती आहे.

Web Title: Vardayini of Solapur; Due to dams in Pune, Ujani dam has been filled 34 times in 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.