रक्ताच्या उलटया होऊन वारकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: July 3, 2017 03:31 PM2017-07-03T15:31:48+5:302017-07-03T15:31:48+5:30
नेवासा जि अहमदनर या वारकऱ्याचा रक्ताच्या उलट्या होऊन दि 2 रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला असल्याची घटना करकंब येथे घडली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
भोसे, दि. 3 - नेवासा जिल्हा नगर येथून आलेल्या दिंडीतील अशोक मुरलीधर कापसे वय 42 रा नागापुर ता नेवासा जि अहमदनर या वारकऱ्याचा रक्ताच्या उलट्या होऊन दि 2 रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला असल्याची घटना करकंब येथे घडली.याबाबतची फिर्याद दिंडीतील जयराम अनारसे रा भानसहिवरा ता नेवासा यांनी करकंब पोलिसात दिली आहे.
आषाढी यात्रेनिमित्त नेवासा येथून आलेली पायीदिंडी दि 2 रोजी करकंब येथील काटवटे वस्ती येथे मुक्कामी होती.दरम्यान रात्रीच्या सुमारास अशोक कापसे हे शौचासाठी जवळच असलेल्या आप्पासाहेब शेट्टी-पाटिल यांच्या ऊसाच्या शेतात गेले असता त्यांच्या रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे.