हॉटेल मालकाने काढला वस्तादचा काटा; पंढरपुरातील खुनाचा पोलिसांनी केला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:58 AM2021-05-31T07:58:48+5:302021-05-31T07:59:21+5:30

पंढरपूर तालुक्यातील कॅनोलमध्ये सापडलेल्या मयत व्यक्तीच्या खुनाचा लागला तपास; पंढरपूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी

Vastaad's fork removed by hotel owner; Police uncover murder in Pandharpur | हॉटेल मालकाने काढला वस्तादचा काटा; पंढरपुरातील खुनाचा पोलिसांनी केला उलगडा

हॉटेल मालकाने काढला वस्तादचा काटा; पंढरपुरातील खुनाचा पोलिसांनी केला उलगडा

googlenewsNext

पंढरपूर : जैनवाडी येथील कॅनोलमध्ये फेब्रुवारी महिन्यात सापडला अनोळखी इसमाच्या खूनाचा गुन्हा उघडकीस झाला आहे. गारवडपाटी (ता. माळशिरस) येथील हॉटेल अहिल्यामधील वस्ताद (कूक) सुरेश कांबळे हा हॉटेल मालक व त्याचे घरातील लोकांना शिवीगाळी करीत होता. यामुळे हॉटेल मालकाने वस्तादचा याचा काटा काढल्याची माहीती तपसा दरम्यान समोर आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितली. 

जैनवाडी (ता.पंढरपुर) येथील पोपट एखतपुरे यांचे शेतातुन जाणारे कॅनालमध्ये ११ फेब्रुवारी २०२१ रोजी एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत दोन्ही पाय व कमरेला सुताचे काळे दोरीने बांधुन अज्ञात कारणावरून निरा भाटघर कॅनालचे वाहते पाण्यात टाकुन दिल्याचे मिळुन आले होते. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी मृतव्यक्ती व त्यांचे नातेवाईकांचा, आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती.

पोलीसांना माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसींग व्यक्तीचे व जैनवाडी येथी कॅनोलमध्ये सापडलेल्या मयत व्यक्तीचे वर्णन मिळते जुळते वाटले. यामुळे त्यांनी हरवल्याची तक्रार देणाऱ्या संजय सिदाम चंदनशिवे (रा.कमलापुर, ता.सांगोला) यांचेकडे विचारपुस केली. त्यावेळी त्याने मयत व्यक्तीचे अंगावरील कपडे जीन पॅन्ट, लक्स कोझी, कमरेचा बेल्ट, हाताचे मनगटातील कारले नक्षी काळा गोफ, ओळखुन सदरचे प्रेत हे त्यांचे मेहुणा सुरेश गणपत कांबळे (वय-४५ वर्षे रा.पिंपळे गुरव, ता.हवेली, जि.पुणे) याचे असल्याचे खात्रीपुर्वक सांगितले.

मयत व्यक्ती सुरेश गणपत कांबळे (वय ४५, रा.पिंपळे गुरव ता.हवेली जि.पुणे) हा गारवडपाटी येथील हॉटेल अहिल्या मध्ये कुक (वस्ताद) म्हणुन गेली १० ते १५ वर्षापासुन काम करीत होता. परंतु अलीकडे त्यास दारूचे व्यसन लागल्याने तो नेहमी दारू पिवुन हॉटेल मालक व त्यांचे घरातील लोकांना शिवीगाळी करीत होता. यामुळे भाऊ मामा हुलगे, मामा भानुदास हुलगे, हणमंत निवृत्ती गोरड (सर्व रा.गोरडवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर) यांनी ०४ फेबुवारी २०२१ रोजी रात्री सुरेश कांबळे हॉटेलचे वरचे मजल्यावरील खोलीत झोपलेला असताना त्याचा कशाने तरी गळा आवळुन त्यास जिवे ठार मारले. या प्रकरणी तीघांना २८ मे २०२१ रोजी अतिरीक्त सत्र न्यायाधीश बावीस्कर यांचे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याना १ जून पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे करीत आहेत. हा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी आटपाडकर, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव गोदे, सपोफौ दिवसे, सपोफौ विलास कांबळे, पोना सुभाष शेंडगे, पोना सुनिल मोरे, पोना मोहसीन सयद, पोकॉ रशीद मुलाणी, रवींद्र बाबर, अपर्णा माळी, अनवर आत्तार, पोना जाधव, पोकॉ आसबे, काळे यांनी मदत केली आहे.

 दगड बांधून मृतदेह पाण्यात

टाकून पुरावा नष्ट करणाचा प्रयत्न

४ फेब्रुवारी रोजी सुरेश कांबळे याला मारुन दुसरे दिवशी ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याचे प्रेत दिवसभर हॉटेलचे वरील खोलीत ठेवुन अंधाराची वाट पाहुन रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान ते प्रेत त्यांचेकडील पांढरे रंगाची स्कापीओ जिप नंबर एम.एच.४५ एन १६२६ हीचे मधुन बिरोबा देवस्थान मंदिरा पासुन इस्लामपुर रोडने निरा भाटघर कॅनालेवे पुलावरून पुढे कॅनाल पट्टीने जावुन ३ किलो मिटर अंतरावर असलेल्या इस्लामपुर (ता.माळशिरस) गावचे शिवारातील १० मोरी येथे नेवुन त्याचे दोन्ही पाय सुताचे काळे रंगाचे दोरीने बांधुन त्यास दगड बांधुन व पोटाला दोरी बांधुन कॅनालचे वाहते पाण्यात फेकुन देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

खून करण्यासाठी हॉटेलच्या

कामगारांना दिली होती सुट्टी

सुरेश कांबळे याचा कायमचा काटा काढणेचे हेतुने भाऊ मामा हुलगे, मामा भानुदास हुलगे, हणमंत निवृत्ती गोरड (सर्व रा. गोरडवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर) यांनी ०४ फेबुवारी २०२१ रोजी हॉटेलमधील इतर कामगांराना उदया कामाला येवु नका असे सांगुन सुट्टी दिली असल्याचे पोनि. प्रशांत भस्मे यांनी सांगितले.

Web Title: Vastaad's fork removed by hotel owner; Police uncover murder in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.