पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद; महामार्गावर मारला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:13+5:302021-07-05T04:15:13+5:30

शांततामय मार्गाने ५८ मोर्चे काढूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे सकल मराठा समाजातर्फे सोलापूर येथे छत्रपती ...

Verbal arguments with police officers; Killed on the highway | पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद; महामार्गावर मारला ठिय्या

पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद; महामार्गावर मारला ठिय्या

Next

शांततामय मार्गाने ५८ मोर्चे काढूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे सकल मराठा समाजातर्फे सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवेढा व सांगोल्यातून सोलापूर येथे जाणाऱ्या आंदोलकांसाठी मंगळवेढा येथील सांगोला नाका, खोमनाळ नाका, बोराळे नाका, माचणूर, बेगमपूर, वाघोली, कामती, तिर्हे, बीएमआयटी काॅलेज, देगावजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामध्ये आंदोलकांच्या गाड्यांची तपासणी करून ४-४ आंदोलकांना सोडण्यात येत होते. अशा आंदोलकांच्या गाड्यांना सोडावे, या मागणीसाठी आ. समाधान आवताडे हे आक्रमक झाले.

यावेळी दामाजीचे संचालक राजन पाटील, औदुंबर वाडदेकर, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौडुभैरी, किशोर देशमुखे, आदिनाथ पुजारी, पप्पू स्वामी, भारत निकम, गणेश गावकरे, भास्कर घायाळ, समाधान घायाळ, हर्षद डोरले, मोहन गोसावी, देवीदास इंगोले, दिगंबर यादव, दीपक सुडके आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

फोटो ::::::::::::::::::

मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर ठिय्या आंदोलनप्रसंगी आ. समधान आवताडे, दामाजीचे संचालक राजन पाटील, किशोर देशमुखे आदी.

फोटो ::::::::::::::::::

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस गाडीतून घेऊन जाताना आ. समाधान आवताडे, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, राजन पाटील, माऊली कोंडुभैरी आदी.

Web Title: Verbal arguments with police officers; Killed on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.