महावितरणच्या प्रतीक्षा यादीवरील ३,०३४ विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची २ व ३ मे रोजी पडताळणी
By admin | Published: April 21, 2017 04:08 PM2017-04-21T16:08:50+5:302017-04-21T16:08:50+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील ३,०३४ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी येत्या २ व ३ मे रोजी संबंधित परिमंडल स्तरावर करण्यात येणार आहे. २ मे रोजी खुल्या प्रवगार्तील तर ३ मे रोजी राखीव प्रवगार्तील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
महावितरणच्या जाहिरात क्र. १/२०१४ नुसार विद्युत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यातआली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या ३,०३४ उमेदवारांची नियुक्ती विद्युत सहाय्यकम्हणून करण्यात येत असून या विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल पातळीवर दि. 2 व 3 मे रोजी करण्यात येईल.
प्रतीक्षा यादीतील ३,०३४ उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर विद्युत सहाय्यक या पदाचे नियुक्तीपत्र संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येईल. उमेदवारांना त्यांच्या आॅनलाईन अजार्ची प्रत तसेच पडताळणीबाबतच्या सूचना महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व उमेदवारांना ग्रुप एसएमएसद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे. उमेदवाराने आॅनलाईन अर्जात दिलेल्या माहितीत तफावत अथवा माहिती चुकीची दिल्याचे पडताळणीत आढळल्यास उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल.