दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:43+5:302021-04-18T04:21:43+5:30

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सपत्नीक मतदान केले. यावेळी त्यांनी पंढरपुरातून परिचारकांची खंबीर साथ ...

Veterans exercised their right to vote | दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

Next

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सपत्नीक मतदान केले. यावेळी त्यांनी पंढरपुरातून परिचारकांची खंबीर साथ मिळणार असल्याने आपला विजय निश्चित असून महाविकास आघाडीचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दिवसभर या दोन्ही उमेदवारांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जवळपास १०३ गावे व शहरातील अनेक मतदान केंद्रांवर भेटी देत आपापल्या कार्यकर्त्यांना उत्साही ठेवण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त मतदान कसे होईल, याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या गावी खर्डी येथे मतदानाचा हक्क बजावला. स्वेरीचे प्रा. बी. पी. रोंगे व त्यांचे कुटुंबीयांनीही खर्डी येथे मतदानाचा हक्क बजावला.

फोटो लाईन ::::::::::::::::::::

१७पंड०१,०२,०३

पंढरपूर येथे आई व पत्नीसोबत मतदान करून बाहेर आलेले उमेदवार भगीरथ भालके. दुसऱ्या छायाचित्रात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे सपत्नीक मतदान केले. त्यावेळी दोन्ही उमेदवार विजयी मुद्रेत, तर प्रशांत परिचारक यांनी खर्डी येथे मतदान केले.

Web Title: Veterans exercised their right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.