विकी गायकवाड खुन प्रकरण; अडीच महिन्यांपासून कुर्डूवाडीत सुरू होती धगधग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:04 PM2018-06-22T17:04:32+5:302018-06-22T17:04:32+5:30

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवरचे स्टेटस देत होते इशारे

Vicky Gaikwad murder case; It started in Kurudwadi for two and a half months | विकी गायकवाड खुन प्रकरण; अडीच महिन्यांपासून कुर्डूवाडीत सुरू होती धगधग

विकी गायकवाड खुन प्रकरण; अडीच महिन्यांपासून कुर्डूवाडीत सुरू होती धगधग

googlenewsNext
ठळक मुद्देदोन गटातील संघर्ष अधिक तीव्रअंतर्गत वातावरण धगधगायला लागले

गोपालकृष्ण मांडवकर
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील २५ हजार लोकसंख्येचे कुर्डूवाडी गाव विक्की गायकवाड या तरुणाच्या हत्येनंतर नव्याने चर्चेत आले आहे. एरव्ही नाकापुढचे सरळ जीवनमान कंठणाºया या गावातील सामंजस्याच्या वातावरणात विक्की गायकवाडच्या खुनामुळे तरंग उठले असले तरी वरवर शांत भासणाºया कुर्डूवाडीतील अंतस्थ आग या खुनानंतरही शमेल काय, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे. 

मृत विक्की गायकवाड हा मूळचा माळशिरसचा. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो कुर्डूवाडीतील त्याचे मेहुणे अमर माने यांच्याकडे राहत होता. अमर माने यांचे कुर्डूवाडीत राजकीय वजन आहे. नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणासोबतच पक्षीय राजकारणातही त्यांची ऊठबस आहे. राजकारणातील स्पर्धेत जवळच्यांची साथ हवी असते. २४ वर्षांचा विक्की मागील काही दिवसांपासून आपल्या मेहुण्यांच्या मदतीसाठी आणि एमपीएससीच्या अभ्यासासाठी कुर्डूवाडीतच राहायला आला होता. 

१७ जूनला झालेल्या खुनीहल्ल्यात विक्की गायकवाडची हत्या  (पान १ वरून) झाली. विक्की हा मूळचा कुर्डूवाडीचा नसल्याने स्थानिक पातळीवर या हत्येचे गंभीर पडसाद उमटलेले दिसत नाहीत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील राजकारणातील सत्तासंघर्षातून आणि वर्चस्ववादातून ही हत्या घडली, हे मात्र तेवढेच खरे आहे. यामुळेच भविष्यात येथील वातावरण गढूळ होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

९ एप्रिल २०१८ रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अमर माने यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. नेमक्या या मुद्यावरून बैठकीनंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलिसांसमक्ष अमर माने आणि माणिक श्रीरामे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या वादात विक्की गायकवाडही सहभागी होता. एकमेकांना पाहून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. नेमक्या याच दिवशी सायंकाळी माणिक श्रीरामे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. माणिक श्रीरामे दोन दिवस बेशुद्धावस्थेत होते.

या घटनेत पोलिसांनी विक्की गायकवाड, अमर माने, त्यांचा भाऊ संतोष माने, अशफाक तौफिक आणि रवी आठवले यांच्यासह पाच जणांवर ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यातील फरार असलेल्या रवी आठवले याला गुरुवारी २१ जूनला दुपारी पोलिसांनी अटक केली. केवळ विक्की आणि संतोष माने वगळता इतरांना जामीन न मिळाल्याने आजही सर्व जण कारागृहातच आहेत.

माणिक श्रीरामे यांच्यावर झालेल्या ९ एप्रिलच्या हल्ल्यापासूनच या दोन गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता. अंतर्गत वातावरण धगधगायला लागले होते. श्रीरामे समर्थक असलेल्या काही तरुणांच्या एम.एस. नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे स्टेटसही बदलले होते. ‘नाद करायचा नाय’, ‘नाद करा की राव, पण आमचा कुठं?’ असे स्टेटस असलेल्या या ग्रुपवरचे संदेशही तेवढेच भडक असायचे. एवढेच नाही तर, विक्कीच्या खुनातील आरोपी असलेल्या विनोद सोनवणे याच्या फेसबुकवरील पोस्टही मागील दोन महिन्यांत गर्भित इशारा देणाºया होत्या. या पोस्ट मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र पोलिसांच्या सायबर सेलला आणि कुर्डूवाडीच्या ठाणेदारांना या बदललेल्या वातावरणाची दखल घेता आली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

‘त्या’ घटनेतील पाचवा आरोपी अटकेत
- ९ एप्रिलच्या सायंकाळी माणिक श्रीरामे यांच्यावरील हल्लाप्रकरणी  ३०७ चा गुन्हा दाखल असलेला रवी आठवले हा पाचवा आरोपी घटनेच्या तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना सापडला आहे. गुरुवारी २१ जूनला अचानकपणे पोलिसांना हा फरार आरोपी सापडल्याने जनतेला आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर करून २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. 

अमर मानेंचा जामिनासाठी अर्ज

  • - ९ एप्रिलला झालेल्या माणिक श्रीरामेवरील हल्लाप्रकरणी कारागृहात असलेले अमर माने यांनी न्यायालयाकडे        जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जावर २१ जूनला सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला. 
  • - माणिक श्रीरामे यांच्यावर झालेल्या ९ एप्रिलच्या हल्ल्यापासूनच या दोन गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता.  श्रीरामे समर्थक असलेल्या काही तरुणांच्या एम.एस. नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे स्टेटसही बदलले होते.

Web Title: Vicky Gaikwad murder case; It started in Kurudwadi for two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.