ऑक्सिजनअभावी रुग्णांचे गेलेले बळी हे सरकारी अनास्थेमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:13+5:302021-04-14T04:20:13+5:30

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. यावेळी शंतनु दंडवते, काशिनाथ थिटे उपस्थित होते. ...

The victims of lack of oxygen are due to government apathy | ऑक्सिजनअभावी रुग्णांचे गेलेले बळी हे सरकारी अनास्थेमुळे

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे गेलेले बळी हे सरकारी अनास्थेमुळे

Next

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. यावेळी शंतनु दंडवते, काशिनाथ थिटे उपस्थित होते. पुढे उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी केवळ स्वप्रतिमा उंचावणे आणि प्रसिद्धी यावरच भर दिला. अर्थसंकल्पातसुद्धा प्रतिमा उंचावण्यासाठी २०० कोटींची तरतूद, आमदारांच्या निधीत वाढ, तर मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि गाड्यांवर वारेमाप खर्च केला; पण कोरोनाच्या महासंकटात आरोग्य सेवेसाठी मात्र सरकारकडे निधी नाही. त्यामुळे या सरकारची नक्की प्राथमिकता तरी काय, हा प्रश्न जनतेला आज पडत आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये थोडेतरी संवेदनशील व्हा, जनतेचे प्रश्न सोडवण्याचे धोरण अवलंबा आणि निरपराध जनतेचे जीव आणि अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त होण्यापासून वाचवा.

घरात बसून केंद्रावर बिनबुडाचे आरोप

सोमवारी दिवसभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याआधी ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ३० रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. मार्च महिन्यात नागपूरमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा संपल्यामुळे चक्क गंभीर असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटना माध्यमातून उघडकीस आल्या म्हणून आपल्यापर्यंत पोहोचल्या. पण राज्यभरात अशा अजून कितीतरी घटना नक्कीच घडल्या असतील. ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसतील. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारला त्याचे काहीही सोयरसूतक नाही. उलटपक्षी आपापल्या घरात बसून केंद्रावर बिनबुडाचे फसवे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्यातच या सरकारला धन्यता वाटते. आज राज्याला असे असंवेदनशील सरकार लाभले आहे, हे खरंच जनतेचे दुर्दैव असल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.

Web Title: The victims of lack of oxygen are due to government apathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.