Video : सलगरचा बैलपोळा, आगळीवेगळी कारहुणवी पाहायला 3 राज्यांतून येतात शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 03:24 PM2019-06-18T15:24:21+5:302019-06-18T15:54:26+5:30
चपळगाव येथील कारहुणवी ही इतर ठिकाणच्या पद्धतीपेक्षा काही वेगळेपण जपणारी आहे.
सोलापूर - (चपळगाव) वर्षभर बळीराजांना शेतीच्या कामात मदत करणार्या बैलजोड्यांचा सण म्हणजे बैलपोळा (अक्कलकोट तालुक्याच्या बोलीभाषेत कारूणी). या दिवशी शेतकरी आपल्या बैलजोड्यांना रंगवून सजवतात, मिरवणूक काढतात, विधिवत पूजा केली जाते. मात्र, सलगर ता. अक्कलकोट येथील बैलपोळा या सर्व बाबींना अपवाद ठरतो.
चपळगाव येथील कारहुणवी ही इतर ठिकाणच्या पद्धतीपेक्षा काही वेगळेपण जपणारी आहे. याठिकाणची ही पद्धत पाहण्यासाठी अक्कलकोट तालुक्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेतकरी बांधव आवर्जून येतात, यास कारणही काही हटकेच आहे. सलगर या अक्कलकोट येथील शेतकरी आपापल्या बैलजोड्यांना सजवून गावातील हनुमान मंदिराजवळ आणतात. येथे खास बैलांना बंडीना (छोटी वैशिष्ट्यपूर्ण बैलगाडी) जोडतात.व पूर्ण ताकतीनिशी हनुमान मंदिराभोवती फेऱ्या घालतात. त्यामध्ये कोणताही जातीभेद मानला जात नाही हे विशेष. या गावातील सर्वच शेतकरी बांधव आपापल्या बैलजोड्यांना पळविण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येक बैलजोडी अधिकाधिक जलद गतीने पळण्यासाठी तत्पर असताना बघ्यांच्या जीवाला देखील धोका उदभवू शकतो. मात्र, ही आगळीवेगळी कारहुणवीची परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात हे नवलच!