बाथरुमला गेलेल्या महिलेचे शुटींग, तरुणावर विनयभंगाचा गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: April 19, 2023 04:16 PM2023-04-19T16:16:52+5:302023-04-19T16:17:18+5:30
पीडित महिला ही फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे.
रुपेश हेळवे, सोलापूर : शहरातील एका फायनान्स कंपनीच्या लेडीज टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेचे शुटींग केल्याप्रकरणी एका तरूणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित ३९ वर्षिय महिलेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीमोन रमेश गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला ही फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे. पीडिता ही १७ एप्रिल रोजी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्या होत्या. जेन्स व लेडीज टॉयलेट हे एकमेकाला लागून आहे. दोन्हीच्यामध्ये एक्झॉस फॅनसाठी जागा आहे पण, तेथे फॅन नाही. दरम्यान पुरूषांच्या बाजूने असणार्या भागातून कोणीतरी मोबाईलद्वारे लेडीज टॉयलेटमध्ये शुटींग करत असल्याचे पीडितेला दिसले. यामुळे पीडित महिलेने बाहेर येऊन याबाबतची माहिती आपल्या सहकार्यांना दिली व त्यावेळी पुरूषांच्या टॉयलेटमधून आरोपी सीमोन गायकवाड हा तेथून बाहेर आला. त्याला विचारणा केल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. नंतर त्याने शुटींग केल्याचे कबूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे पीडित महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सीमोन गायकवाड याच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास मपोसई जेऊघाले करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"