Video : चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलतानाही ST कर्मचाऱ्याला रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:56 PM2021-10-29T19:56:41+5:302021-10-29T20:02:52+5:30
आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे
सोलापूर - एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सरकार जर दुर्लक्ष करणार असेल, तर आम्हाला ST कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच यावेळी दिला. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ST मधील एका कर्चचाऱ्याचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सोलापूरमध्येही आज तेच चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना काही कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. वाढती महागाई आणि नोकरीतून मिळणार कमी पगार, अनियमितता तसेच विविध समस्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. चंद्रकांत पाटील मीडियाशी संवाद साधत असतानाही या कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. आकाशी रंगाचा टी शर्ट घातलेला तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पाठीमागे रडत असल्याचं दिसून येतंय.
ST कर्मचाऱ्यांना कोसळल रडू, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका pic.twitter.com/YQ2K4gvOAR
— Lokmat (@lokmat) October 29, 2021
कालच औसा येथे एसटी कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांच्या व्यथा ऐकून उद्विग्न झालो होतो. आज चालकानं एसटीतच आत्महत्या केल्याची बातमी आली. शेतकऱ्यानं शेतात केलेल्या आत्महत्येइतकंच हे भीषण आहे. हा आक्रोश मविआ सरकारच्या कानी जात नाही? आत्महत्या नव्हे, ही तर सरकारी कारभारातून झालेली हत्याच असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे. सोलापुरात आज आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सरकार जर दुर्लक्ष करणार असेल, तर आम्हाला ST कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा या वेळी दिला. pic.twitter.com/Q59gVTahuN
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 29, 2021