विजयसिंह मोहिते-पाटील विकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:45+5:302021-01-19T04:24:45+5:30

सन १९२२ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली अकलूज ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीच्या ...

Vijay Singh Mohite-Patil Development Front dominates | विजयसिंह मोहिते-पाटील विकास आघाडीचे वर्चस्व

विजयसिंह मोहिते-पाटील विकास आघाडीचे वर्चस्व

Next

सन १९२२ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली अकलूज ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स.म. शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास आघाडी, तर डाॅ. धवलसिंंह मोहिते-पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, पांडुरंगराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन आघाडी असे मातब्बर नेते असलेल्या दोन्ही आघाडींतील लढतीमुळे अकलूज ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

या निवडणुकीत लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील परिवर्तन आघाडीच्या प्रभाग ५ मधील उमेदवार उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधातील उमेदवार रेहना बागवान यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली होती. १६ जागेसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होऊन स.म. शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास आघाडीचे प्रभाग १ मधील उमेदवार संजय भजनदास साठे, रेश्मा विनायक गायकवाड, ज्योती हनुमंत फुले, प्रभाग २ मधून शीतलदेवी सतीशराव माने-पाटील, क्रांतिसिंह किशोरसिंह माने-पाटील, वैष्णवी स्वप्नील दोरकर, प्रभाग ४ मधून शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील, किशोर राऊत, रेश्मा तांबोळी, प्रभाग ५ मधून सायली सुधीर मोरे, गणेश रामदास वसेकर, प्रभाग ६ मधून धनंजय माणिकराव देशमुख, नाशिक विठ्ठल सोनवणे, नीता सुधीर शिवरकर तर लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील परिवर्तन आघाडीचे प्रभाग क्र. ३ मधून गिरीराज गणपतराव माने-पाटील, ज्योती अनिल कुंभार निवडून आले.

Web Title: Vijay Singh Mohite-Patil Development Front dominates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.