विजयदादा, रणजितदादांची आवताडे सोबतची चर्चा निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:22 AM2021-04-02T04:22:29+5:302021-04-02T04:22:29+5:30

मंगळवेढा : तालुक्यातील मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. समाधान आवताडे यांच्याविरोधात त्यांचेच चुलत बंधू खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ...

Vijaydada, Ranjitdada's discussion with Avtade was fruitless | विजयदादा, रणजितदादांची आवताडे सोबतची चर्चा निष्फळ

विजयदादा, रणजितदादांची आवताडे सोबतची चर्चा निष्फळ

Next

मंगळवेढा : तालुक्यातील मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. समाधान आवताडे यांच्याविरोधात त्यांचेच चुलत बंधू खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे हे उभे राहिले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री विजयदादा व आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. मोहिते-पाटील पितापुत्र व आवताडे पितापुत्रांची चर्चा निष्फळ ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळवेढ्यात गुरुवारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात तब्बल दोन तास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

याप्रसंगी माजी सभापती राजाराम जगताप, दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष सूर्यकांत ठेंगील, जयंत साळे, बाबासाहेब कोंडुभैरी, विजय बुरकुल आदी उपस्थित होते.

दरम्यान बबनराव आवताडे यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा राबविण्याच्या सूचना या बैठकीनंतर दिल्या आहेत.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्यासाठी मंगळवेढ्यात आले होते.

बबनराव आवताडे यांच्या कार्यक्रमात तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा सुरू होती. या दौऱ्यात विजयदादांनी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या निवासस्थानी भेट दिली. येथे कार्यकर्त्याबरोबर चर्चा केली. मात्र बबनराव आवताडे यांनी पुत्र सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. या बैठकीत नंतर मतदारसंघात आपण विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत असल्याचे उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी सांगितले.

Web Title: Vijaydada, Ranjitdada's discussion with Avtade was fruitless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.