सीमेवर लढणाऱ्या जवानाची कोरोनाकाळात गावची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:59+5:302021-05-22T04:20:59+5:30
लोकसंख्या २ हजार ४०० असणाऱ्या खरसोळी गाव हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. १३० जण कोरोनाबाधित झाले आहेत. गावातील चांगली ...
लोकसंख्या २ हजार ४०० असणाऱ्या खरसोळी गाव हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. १३० जण कोरोनाबाधित झाले आहेत. गावातील चांगली ६ माणसं कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्याचप्रमाणे ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आठ दिवसांच्या सुटीनिमित्त गावी आले असताना त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. सुभेदार हणमंत काळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी खरसोळी येथे येऊन कौतुक केले.
वडिलांच्या पुण्यतिथीला बगल देऊन छगन पवार, दिगंबर कांबळे, मोहोन काळे, विकास पवार, विजय पाटील, अमर पवार यांना सोबत घेऊन गेल्या आठ दिवसांपासून देशाच्या सेवेबरोबर गावच्या सेवेत मग्न असणाऱ्या सुभेदार काळे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
----
ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांना शासनाला सहकार्य करावे.
-हणमंत काळे, सुभेदार