खोऱ्या, फावडे घेऊन शिवार सुफलाम् करण्यासाठी गावं झाली सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:37+5:302021-08-12T04:26:37+5:30
पाणी फाउंडेशनमध्ये मानेगाव, भेंड, रोपळे (क), उजनी (मा) अकुलगाव, उपळाई (खुर्द), धानोरे, जामगाव, वडाचीवाडी, परितेवाडी, लोंढेवाडी, बुद्रूकवाडी या गावांचा ...
पाणी फाउंडेशनमध्ये मानेगाव, भेंड, रोपळे (क), उजनी (मा) अकुलगाव, उपळाई (खुर्द), धानोरे, जामगाव, वडाचीवाडी, परितेवाडी, लोंढेवाडी, बुद्रूकवाडी या गावांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोराडे हे होते. यावेळी पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ व उमेदचे निलेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मानेगावचे सुहास पाटील (कृ.ऊ.बा.संचालक), भेंडचे सरपंच डॉ. संतोष दळवी, डॉ. विवेकानंद पाटील, रोपळे गावच्या सरपंच वैशाली गोडगे, उपसरपंच महानंदा पाटील, प्रा. योगेश दळवे, तानाजी दास, धनाजी पाटील, श्रीपाद दळवे, शरद पाटील, माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे, अतुल दास, किरण सुतार, अण्णा पवार, अर्जुन जाधव, सुधीर गोडगे, अनिल दास, नाना दास (तंटामुक्त अध्यक्ष), अशोक मेहेर, संजय बनकर, अरुण लोंढे, सत्यवान देशमुख, सुशांत गायकवाड, समीक्षा पिंपळकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीशराजे निंबाळकर, अमीर मुलाणी, निखिल जगताप, वैभव सुपेकर, सचिदानंद पाटील, भैरवनाथ वाघमारे, सौरभ गोडगे, ओमकार दास, रामचंद्र दास, विकी पाटील, विशाल वाघचौरे, चक्रधर दास, महेश फंड, रोहन जगताप, रोहित भोंग, वैभव मेहेर, आदित्य गोडगे यांनी परिश्रम घेतले.
---
फोटो १० कुर्डूवाडी
रोपळे (क) ता. माढा येथे पाणी फाउंडेशनच्या ग्राम समृद्ध योजनेत पात्र झालेल्या गावांचा सन्मान सोहळा संपन्न झाला, त्यावेळी गाव प्रमुखांसोबत पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी.
---
100821\img-20210808-wa0334.jpg
रोपळे(क) ता माढा येथे पाणी फाऊंडेशनच्या ग्राम समृद्ध योजनेत पात्र झालेल्या गावांचा सन्मान सोहळा संपन्न झाला, त्यावेळी गाव प्रमुखांसोबत पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी