बार्शी-सोलापूर राज्यमार्गावर पानगावमध्ये सर्व्हिस रोडसाठी ग्रामस्थांनी रोखले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:13+5:302021-06-02T04:18:13+5:30
पानगाव हे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गावासह आजूबाजूच्या साकत, कळंबवाडी (पान),रस्तापूर, उंडेगाव, दडशिंगे या गावातील वाहनाची येथे दररोज ...
पानगाव हे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गावासह आजूबाजूच्या साकत, कळंबवाडी (पान),रस्तापूर, उंडेगाव, दडशिंगे या गावातील वाहनाची येथे दररोज गर्दी होत असते. तसेच मूळ सोलापूर रस्त्यावरील वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावातून जाणारा रस्ता मोठा असावा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चालू रस्त्याच्या दुतर्फा गटार करण्यात येणार असून, गावाच्या पूर्वेकडील गटारीचे काम झाले आहे तर गावाच्या पश्चिमेकडील काम अजून बाकी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटार आणि मधे रस्ता झाल्यानंतर दळणवळण करताना स्थानिकांना वारंवार मुख्य रस्त्यावर यावे लागणार आहे. म्हणून बसस्थानक परिसरात रस्ता रुंदीकरण करणे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ता करून देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
यावेळी सदर मागणी भाऊसाहेब आंधळकर यांनी समजावून घेत मार्गी लावू असे म्हणत ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.
----
पानगाव येथील ग्रामस्थांच्या रस्त्यासंदर्भातील मागणीविषयी चर्चा करण्यासाठी पुढील दोन दिवसात प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत. सोबत वरिष्ठ अधिकारीही येणार आहेत त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढू
- एस. व्ही. होनमुटे, उपभियंता सा. बां. उपविभाग बार्शी.
----
ऐतिहासिक वारसा असलेल्या पानगाव या ठिकाणी रस्ते प्रशस्त असावेत. या ठिकाणाहून जिल्ह्याला जाणारी वाहतूक मोठी आहे.त्यामुळे पानगाव ग्रामस्थांच्या मागणीचा विचार प्राधान्याने व्हावा. त्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
- भाऊसाहेब आंधळकर, शिवसेना नेते बार्शी
---
बार्शी सोलापूर रस्त्यावरील शाळा, महविद्यालय, दवाखाने, बसस्थानक आदी आस्थापना तसेच बहुतांश शासकीय विभागाची कार्यालये असल्याने रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे रस्ता मोठा असणे गरजेचे आहे.
- लक्ष्मण नाईकवाडी, ग्रामस्थ
----
===Photopath===
010621\img-20210531-wa0001.jpg
===Caption===
बार्शी-सोलापूर राज्यमार्गावर पानगाव मध्ये सर्व्हिस रस्ता करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले