अवैध धंद्याला विरोध करणाऱ्या पोलीसपाटलासह महिलांना हवादाराकडून दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:14+5:302021-07-31T04:23:14+5:30
भुरीकवठे गाव उस्मानाबाद, सोलापूर सीमावर्ती भागात आहे. दोन हजार लोकसंख्येच्या गावात तब्बल सात अवैध हातभट्टी दारू विक्री जोरात ...
भुरीकवठे गाव उस्मानाबाद, सोलापूर सीमावर्ती भागात आहे. दोन हजार लोकसंख्येच्या गावात तब्बल सात अवैध हातभट्टी दारू विक्री जोरात सुरू आहे. यामुळे संपूर्ण गाव व्यसनाधीन बनले आहे. यामुळे महिला संतापल्या. महिलांनी पोलीसपाटील शांता भंगरगी यांच्याकडे सतत तक्रारी केल्या. म्हणून दारूबंदीसाठी शेकडो महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.
त्यावरून अधिकाऱ्यांनी तत्काळ दारू धंदे बंद करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना दिल्या. त्यावरून बीट हवालदार अंकुश राठोड यांनी गावी येऊन सार्वजनिक ठिकाणी महिला पोलीसपाटील व गावातील तक्रारकर्त्या महिलांना बोलावून लोकांसमोर त्यांची अक्कल काढून शिवीगाळ केली. अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत महिलांनी त्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
-----