सोलापुरातून अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी, पालिका, पोलीस अधिकाºयांवर संताप व्यक्त केला संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:56 PM2018-02-27T14:56:24+5:302018-02-27T14:56:24+5:30

कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येणार आहेत.

Violence expressed at 300 complaints of atrocity, municipal corporation, police officials from Solapur | सोलापुरातून अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी, पालिका, पोलीस अधिकाºयांवर संताप व्यक्त केला संताप 

सोलापुरातून अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी, पालिका, पोलीस अधिकाºयांवर संताप व्यक्त केला संताप 

Next
ठळक मुद्देजातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारीकायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाश्रीशैल गायकवाड यांच्यासह ३०० कामगारांनी वैयक्तिक पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह १० ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येणार आहेत.
आठ महिन्यांपासून नियमित वेतन न मिळाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कायदेशीर परवानगी घेऊन आंदोलन केले जात होते. तेव्हा आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यांचा ९० हजारांचा मोबाईल फोडण्यात आला. कामगारांना मारहाण करण्यात आली व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्तांवर खुनीहल्ला करण्यात आला, फिर्याद देऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक पाहता आयुक्तांवर खुनीहल्ला केला असता तर त्यांना थोडीतरी इजा झाली असती. महापालिकेत काहीतरी नुकसान झाले असते, असा कोणताही प्रकार घडला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात रेकॉर्ड झाला आहे. त्यात कुठेही खुनीहल्ला करताना दिसत नाही. श्रीशैल गायकवाड यांच्या हातात रॉकेलची बाटली दिसत नाही. असे असताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्मचारी संघटनेवर अन्याय झाला आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक एन. जी. अंकुशकर,                 गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक              आय. एस. सय्यद, पोलीस उपनिरीक्षक एस. सी. पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक जे. जी. कजाकवाले यांच्या विरोधात श्रीशैल गायकवाड यांच्यासह ३०० कामगारांनी वैयक्तिक पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह १० ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत.  जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. एकाच वेळी ३०० कर्मचाºयांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या तक्रारी करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच धक्कादायक प्रकार आहे. 

Web Title: Violence expressed at 300 complaints of atrocity, municipal corporation, police officials from Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.