पंढरपूर बंदला हिंसक वळण, दगडफेक, गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता, ग्रामीण पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:21 PM2018-01-04T15:21:41+5:302018-01-04T15:27:02+5:30
भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लागले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लागले़
पंढरपूर शहरातील आंबेडकर संघटनांनी सोमवारी गुरूवारी पंढरपूर शहर बंदची हाक दिली होती़ त्यानुसार शहरातील शाळा, महाविद्यालय, दुकाने, एसटी बसेस बंद ठेवण्यात आली होती़ सकाळी ११ च्या सुमारास डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ निषेध सभा घेण्यात आली़ या सभेत सर्वपक्षीय नेते, संघटना सहभागी झाल्या होत्या़
पंढरपूर शहर बंदच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, श्रीकांत पांडूळे, सपोनि सारंग चव्हाण, चंद्रकांत गोसावी, रतन गभाले आदी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी शांतता राखण्याचे आवाहन केले़ निषेध सभा झाल्यानंतर पंढरपूरचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले़