गाळेधारक व्यापाºयांचा सोलापूर महापालिकेवर विराट क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:48 AM2018-07-09T11:48:25+5:302018-07-09T11:50:48+5:30
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळ्याबाबतची ई-टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी, चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी व संलग्न सर्व असोसिएशनमधील व्यापारी तसेच सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला़
याबाबत नवीपेठ व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी सांगितले की, बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या १४00 गाळ्यांच्या प्रश्नावर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे ई-टेंडरिंग लिलाव पद्धतीच्या भूमिकेवर ठाम आहेत. गाळ्यांसंदर्भात समिती नेमण्यात यावी, त्याच्या अहवालानुसार महापालिकेला भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत. याबाबत चर्चा करा असे सांगत असतानाही आयुक्त ऐकून घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले़
मोर्चाची सुरूवात नवीपेठ पारस इस्टेट येथून करण्यात आली़ हा मोर्चा मोर्चा मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा चौक, डॉ. आंबेडकर चौक मार्गे सोलापूर महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर विसर्जि करून त्याचे रूपांतर सभेत करण्यात आले़
या मोर्चात मोर्चात सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या संलग्नित सर्व व्यापारी असोसिएशन, चेंबर्सचे पदाधिकारी, सर्वपक्षीय अध्यक्ष, नेते, गटनेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते़