विजयकुमार चव्हाण यांच्याकडून दोन ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:44+5:302021-05-22T04:20:44+5:30
ऑक्सिजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांना सेवा देत असतांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर ताण वाढला ...
ऑक्सिजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांना सेवा देत असतांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर ताण वाढला आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे चिंतेत भरच पडली होती. चव्हाण यांनी कोविड सेंटर मधील गरज लक्षात घेत स्वखर्चाने एक लाख रुपयाचे दोन ऑक्सिजन मशीन बुधवारी (दि. १९) रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, सरपंच शिवलाल राठोड, वैद्यकीय अधीक्षक अशोक राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करंजखेड, नगरसेवक बंटी राठोड, महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे, के व्ही राठोड, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
फोटो २० अक्कलकोट
ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर अक्कलकोट कोविड सेंटरला भेट देतांना आ. सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, मोतीराम राठोड,सरपंच शिवलाल राठोड, डॉ.अशोक राठोड, डॉ. अश्विन करजखेडे आदी.