पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला बेलाच्या पानांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 09:10 IST2020-02-21T09:05:20+5:302020-02-21T09:10:59+5:30
महाशिवरात्री विशेष; पांडुरंगाच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची गर्दी

पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला बेलाच्या पानांची आरास
ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनबेलाच्या पानाची आरस केल्यामुळे मंदिर परिसर खुललेमहाशिवरात्रीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी
पंढरपूर : महाशिवरात्रीनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील आनंद कटप यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली असून यासाठी सुमारे ४०० किलो बेलाच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोलापूर जिल्ह्यासह परराज्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.