आता ३१ मेपर्यंत पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

By Appasaheb.patil | Published: May 19, 2020 03:04 PM2020-05-19T15:04:16+5:302020-05-19T15:07:35+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय; परंपरेनुसार पूजोपचार सुरूच राहणार...!

Vitthal-Rukmini temple in Pandharpur closed for devotees till May 31 | आता ३१ मेपर्यंत पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

आता ३१ मेपर्यंत पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

googlenewsNext
ठळक मुद्देश्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सर्व सदस्य यांच्याशी विचारविनियम करून एकमताने निर्णय श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधितश्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी करण्यात येत आहेत

पंढरपूर :  कोरोना व्हायरस (कोविड-१९) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा आहे़ राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने व भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर आता ३१ मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला घेतला आहे.

केंद्र व राज्य शासनाने ३१ मे २०२० पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. तसेच आपल्या सोलापूर जिल्हयात देखिल कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. ही बाब विचारात घेता. मंदिरे समितीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर ३१  मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 मात्र, श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी करण्यात येत आहेत़ वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदनउटी पुजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतची माहिती श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सर्व सदस्य यांच्याशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

Web Title: Vitthal-Rukmini temple in Pandharpur closed for devotees till May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.