विठ्ठल भक्तांसाठी 'विठाई' बससेवा आजपासून सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:12 PM2018-12-23T17:12:21+5:302018-12-23T17:15:43+5:30

राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम

Vitthal service bus service for Vitthal devotees from today | विठ्ठल भक्तांसाठी 'विठाई' बससेवा आजपासून सेवेत

विठ्ठल भक्तांसाठी 'विठाई' बससेवा आजपासून सेवेत

Next
ठळक मुद्देपंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्रप्रवास, राहणे, जेवण एकाच पॅकेजमध्येखाजगी वाहतूकदारांची लूट थांबवणार


पंढरपूर : राज्यभरातून पंढरपुरला येणाºया भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने खास ‘विठाई’ बससेवा सुरू केली असून २४ डिसेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात या सेवेचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.


पंढरीत होणाºया महामेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पंढरपूर हे वारकºयांचे तीर्थक्षेत्र आहे़ आषाढी एकादशीनिमित्त १० लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येतात. शिवाय वार वारी आणि दररोज हजारो भाविकांची पावले पंढरीकडे वळतात. विठ्ठलभक्तांचा हा ओघ राज्याच्या कानाकोपºयातून सुरू असतो. अनेक भाविक परराज्यातूनही येतात. पंढरीत येण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. पण अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपूरला येणाºया भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १० बस वारकºयांच्या सेवेत दाखल होतील. 


दापोडीत विठाई बसची निर्मिती
दापोडी (पुणे) येथे या बसची निर्मिती करण्यात येत आहे. एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. पंढरपूरला जाणाºया भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या हेतूने ‘विठाई’ची रचना आकर्षक बनवली आहे. बसच्या बॉडीवर विठ्ठल आणि वारकºयांचे चित्र आहे. पांढºया आणि लाल रंगात ती उठून दिसते. आरामदायी आसन व्यवस्था आहे. खिडक्या मोठ्या आणि हवेशीर आहेत. तसेच नियमित बसपेक्षा याची उंची वाढवली आहे. याशिवाय अ‍ॅल्युमिनियमऐवजी पोलादी पत्र्याचा वापर केला आहे. तसेच आरामदायक आसने, दोन आपत्कालिन दरवाजे असून एकूण ४२ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उपक्रम
प्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही विठाई बस सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना अगोदर गटागटाने नोंदणी करणे आवश्यक आहे़ या बसने प्रवास करणाºया भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. एकाच पॅकेजमध्ये प्रवास, राहणे व जेवण या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल.

Web Title: Vitthal service bus service for Vitthal devotees from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.