राजकीय पक्षाच्या चोऱ्या पांडुरंगच थांबवेलं; जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:33 AM2023-10-06T11:33:34+5:302023-10-06T11:34:43+5:30
पुढे ते म्हणाले, एका पक्षाची चोरी झाली आहे. आता दुसऱ्या पक्षाची चोरी होऊ नये
सचिन कांबळे
पंढरपूर : भारतात पक्षाच्या चोऱ्या व्हायचं प्रमाण वाढत आहे. एका पक्षाची चोरी झाली आता दुसऱ्या पक्षाची चोरी होऊ नये ही विठ्ठलाची परीक्षा आहे. आणि देवच पक्षाच्या चोऱ्या व्हायचं प्रमाण थांबवावं असे साकडं विठ्ठलाकडे घातले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादीचे युवराज पाटील, गणेश पाटील, नागेश फाटे, संदीप मांडवे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, एका पक्षाची चोरी झाली आहे. आता दुसऱ्या पक्षाची चोरी होऊ नये. यासाठी विठ्ठलाचीच परीक्षा आहे. आमदार पक्ष्यातून गेले तर पक्ष गेला असे नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. आमच्या बाजूने निर्णय देईल असा, समोरच्या बाजूने आत्मविश्वास आहे. निवडणूक आयोग चुकीचा निर्णय देणार नाही दिला तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.