आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाइन पध्दतीने मिळणार २४ तास दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 02:07 PM2021-06-03T14:07:41+5:302021-06-03T14:08:45+5:30

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची  बैठक

Vitthal Temple closed during Ashadi Yatra, Darshan will be available 24 hours online | आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाइन पध्दतीने मिळणार २४ तास दर्शन

आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाइन पध्दतीने मिळणार २४ तास दर्शन

googlenewsNext

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑन लाईन पध्दतीने १२ जुलै पासून (प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत) भाविकांना २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची  बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पंढरपूर येथील भक्त निवास मध्ये संपन्न झाली. यानंतर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा साधना  भोसले उपस्थित होत्या.

पुढे औसेकर म्हणाले, मानाचे नैवद्य आहेत, त्या सर्वांना देवाला मानाचा नैवेद्य दाखवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  ज्यांच्या पादुका व पालखी भेटी ठरेलेल्या आहेत, त्या भेटी घडवण्यात येणार आहे. 

मानाचे वारकरी, दिडेंकरी व मानाची महाराज असे १९५ मंडळींना देवाचे दर्शन देण्याचे ठरवण्यात आले आहे. पंढरपुरातील फडकरी व येणाऱ्या दिंड्यांना नगरप्रदक्षिणा करण्यासाठी व पांडुरंगाच्या रथाला देखील विठ्ठल मंदिराला प्रदक्षणा करण्याची परवानगी देण्यात आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या अडचणी सोडवून वारकऱ्यांची सोयी सुविधा उपलब्ध देण्यासंदर्भात मंदिर समिती तयार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

 महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण 

२० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

 

Web Title: Vitthal Temple closed during Ashadi Yatra, Darshan will be available 24 hours online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.