रोज १२ तास खुले राहणार विठ्ठल मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:23+5:302021-03-27T04:23:23+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन १७ मार्चपासून २०२० भाविकांना विठ्ठलाचे दर्शन बंद करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार १६ ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन १७ मार्चपासून २०२० भाविकांना विठ्ठलाचे दर्शन बंद करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार १६ नोव्हेंबर २०२० पासून भाविकांना फक्त विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार २५ मार्च २०२१ रोजी सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मध्ये सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील.
त्यानुसार शुक्रवारपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना फक्त १२ तासच विठ्ठल दर्शनासाठी खुले राहणार आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे बुकिंग करून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. रोज फक्त १५०० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहणार आहेत. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पद्धतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पडता किंवा व्यत्यय न आता मंदिरात नित्य म्हणजे दैनंदिन पुजोपचार चालू ठेवण्यात येत आहे. त्याच बरोबर सण व उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याची निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
मंदिर समितीचे सदस्य रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, ॲड. माधवी निगडे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, सुजितसिंह ठाकूर, ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हभप प्रकाश जवंजाळ, अतुल शास्त्री भगरे हभप शिवाजी मोरे, साधना भोसले यांच्याशी विचारविनिमय करून एकमताने निर्णय घेतला असल्याचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.