विठ्ठलराव शिंदे कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पाच नव्या चेहऱ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:38 AM2021-02-18T04:38:38+5:302021-02-18T04:38:38+5:30
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध होत आहे. सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ...
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध होत आहे. सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये मागील कालावधीत व्हाइस चेअरमन पांडुरंग पाटील यांच्यासह बाळासाहेब ढवळे, सीताराम गायकवाड व नंदाताई सुर्वे या ४ संचालकांना पुन्हा संधी मिळाली नाही. विक्रमसिंह बबनराव शिंदे, सचिन कल्याणराव देशमुख, लाला मारुती मोरे, संदीप भुजंगराव पाटील व पांडुरंग देवराव घाडगे या पाच नवीन चेहऱ्यांना संचालक होण्याची संधी देण्यात आली आहे.
२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नूतन संचालकांची औपचारिक घोषणा केल्यानंतर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे असणार आहे. आमदार बबनराव शिंदे, रमेश येवले-पाटील (टेंभुर्णी), वामनराव उबाळे (म्हैसगाव), सुरेश बागल (बारलोणी), पोपट गायकवाड (रिधोरे), अमोल चव्हाण (उंदरगाव), निळकंठ पाटील (मानेगाव), शिवाजी डोके (कन्हेरगाव), लक्ष्मण खुपसे (उपळवाटे), विष्णू हुंबे (बेंबळे), प्रभाकर कुटे (टेंभुर्णी), वेताळ जाधव (रांझणी), भाऊराव तरंगे (पापनस), रणजितसिंह शिंदे (निमगाव), पोपट चव्हाण (घोटी), विक्रमसिंह शिंदे (निमगाव), लाला मोरे (नगोर्ली), सचिन देशमुख (आलेगाव), पांडुरंग घाडगे (टाकळी), सिंधूताई नागटिळक (कुंभेज) संदीप पाटील (बुद्रूक वाडी)
------