विठ्ठलराव शिंदे कारखाना २३७५ रुपये दर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:36+5:302021-02-22T04:15:36+5:30
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेत २१ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हा निबंधक तथा ...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेत २१ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हा निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी केली.
यावेळी
बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सादर केला. कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत काटकसरीने कारभार करून सर्वांच्या सहकार्याने अडीच हजार मे. टनावरून ११ हजार मे. टन गाळप क्षमतेपर्यंत विस्तारवाढ केली. को. जन प्रकल्प, डिस्टलरी, शून्य प्रदूषण प्रणाली प्रकल्प यासह सर्व आघाड्यावर कारखाना अद्ययावत केला. तसेच कारखान्याच्यावतीने गणेश पाणीपुरवठा योजना व हरित क्रांती पाणीपुरवठा योजना उत्कृष्ट पद्धतीने चालवून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीत महत्वाची भूमिका पार पाडली. गोरगरिबांसाठी कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह सोहळा, नेत्ररोग निदान व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, आरोग्य शिबिर, काशी यात्रा असे मोफत उपक्रम राबविले. २० वर्षात सर्वांच्या सहकार्याने चौथ्यांदा बिनविरोध निवडीची परंपरा राखण्यात यश आल्याबद्दल आ. शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
असे आहे बिनविरोध संचालक मंडळ
आ. बबनराव शिंदे, रमेश येवले-पाटील, वामनराव उबाळे, सुरेश बागल, पोपट गायकवाड, अमोल चव्हाण, नीळकंठ पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, विष्णू हुंबे, प्रभाकर कुटे, भाऊराव तरंगे, रणजितसिंह शिंदे, लाला मोरे, वेताळ जाधव, सचिन देशमुख, विक्रमसिंह शिंदे, पांडुरंग घाडगे, पोपट चव्हाण, सिंधुताई नागटिळक, संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
फोटो
२१टेंभुर्णी०१, ०२
ओळी
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेस मास्क घालून उपस्थित असलेले चेअरमन, संचालक मंडळ व सभासद शेतकरी.