विठ्ठलराव शिंदे कारखान्याची निवडणूक ताकदीनिशी लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:12+5:302021-02-08T04:20:12+5:30

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी टेंभुर्णीत बैठक आयोजित केली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात ...

Vitthalrao Shinde will contest the factory election with vigor | विठ्ठलराव शिंदे कारखान्याची निवडणूक ताकदीनिशी लढविणार

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची निवडणूक ताकदीनिशी लढविणार

Next

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी टेंभुर्णीत बैठक आयोजित केली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

ही निवडणूक शिवसेना, भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना यांच्या वतीने लढविण्यात येणार असल्याचे संजय कोकाटे यांनी सांगितले.

या बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत पाटील, रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील, रासपचे माऊली सलगर, स्वाभिमानीचे आजिनाथ परबत, पोपट अनपट, अतुल खुपसे, सिंधूताई मोरे, सत्यवान गायकवाड, अण्णासाहेब जाधव, विठ्ठल मस्के, पंडित साळुंखे, प्रशांत गिड्डे, दिलीप गडदे, वंचित बहुजन आघाडीचे विशाल नवगिरे, प्रताप गायकवाड, सुधीर महाडिक, निवृत्ती तांबवे, विठ्ठल गायकवाड, सतीश सुर्वे, किशोर नाळे, मगन महाडिक उपस्थित होते.

संजय कोकाटे म्हणाले, सहकारामध्ये कोणताही पक्ष नसतो. सगळ्यांनी मिळून लढा द्यावयाचा आहे. शिवसेनेने पक्ष म्हणून आमदार बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिला, तर तो मी मानणार नाही, असेही कोकाटे म्हणाले.

शिवाजी पाटील म्हणाले, कारखान्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून, आम्हाला विश्वास आहे की, दोषीवर नक्की कारवाई केली जाईल. दुसऱ्यांच्या नावावर कर्ज उचलणाऱ्यांना आता जावे लागेल.

फोटो

०७टेंभुर्णी०१

ओळी

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासंदर्भात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना संजय कोकाटे.

Web Title: Vitthalrao Shinde will contest the factory election with vigor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.