‘विठ्ठलराव शिंदे’चे सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:49+5:302021-09-13T04:21:49+5:30

ऑफ सीझनमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या हंगामात कारखान्याचे १२.५ मे.वॅट सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी ५० लाख ...

Vitthalrao Shinde's six lakh m. Aim to grind tons of sugarcane | ‘विठ्ठलराव शिंदे’चे सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

‘विठ्ठलराव शिंदे’चे सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Next

ऑफ सीझनमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या हंगामात कारखान्याचे १२.५ मे.वॅट सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी ५० लाख युनिट वीज निर्यात होणे अपेक्षित आहे. यंदा कारखान्याने सहा हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

करकंब येथील विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट २ च्या गाळप हंगामचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सिंधू चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार बबनराव शिंदे होते. यावेळी ते बोलत होते. बॉयलर अग्निप्रदिपन समारंभानिमित्त संचालक सचिन देशमुख व त्यांच्या पत्नी सोनाली देशमुख यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली.

यावेळी संचालक शिवाजी डोके, रमेश येवले-पाटील, प्रभाकर कुटे, लक्ष्मण खुपसे, सुरेश बागल, वेताळ जाधव, लाला मोरे, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, युनिट २ चे जनरल मॅनेजर एस. आर. यादव, एस. एस. महामुनी, बी. जे. साळुंखे, शेतकी अधिकारी बी. डी. इंगवले, सी. एस. भोगाडे, पी. एस. येलपले, एस. पी. थिटे, पी. ए. थोरात, पी. व्ही. बागल, सुरक्षा अधिकारी एफ. एम. दुंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Vitthalrao Shinde's six lakh m. Aim to grind tons of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.