११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:03 AM2019-10-19T11:03:09+5:302019-10-19T11:08:46+5:30

सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची तयारी: नॉर्थकोट, नूतन प्रशाला, एसआरपी कॅम्प येथे होणार उत्तर, मध्य अन् दक्षिणची मतमोजणी

Vote of firecrackers in the 4 constituencies will be gone! | ११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार !

११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार !

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर ईव्हीएम: ४२२७, कंट्रोल युनिट: ५३२२ आणि व्हीव्हीपॅट: ४५७६ लागणार११ विधानसभा मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी १८ हजार ३१० कर्मचारी नियुक्त१४०० च्या पुढे मतदारसंख्या असणारी ६५ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी अतिरिक्त व्हीव्हीपॅट मशीन लागणार

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा समारोप शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. गेले पंधरा दिवस विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू असलेले भोंगे आज बंद होणार आहेत. प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू केली असून, सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापूरची मतमोजणी रामवाडी गोदामाऐवजी अनुक्रमे नॉर्थकोट हायस्कूल, नूतन प्रशाला आणि एसआरपी कॅम्प येथे केली जाणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक दिवस उरला आहे. विधानसभेच्या ११ जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीची प्रचारधुमाळी शेवटच्या टप्प्यात चुरशीची बनली आहे. महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांतील नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली. त्यामुळे विमाने व हेलिकॉप्टरच्या घिरट्या वाढल्या होत्या. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, रॅली, कॉर्नर सभा आणि जाहीर सभांवर भर दिला. शनिवारी प्रचाराचा समारोप पदयात्रेद्वारे करण्याचे उमेदवारांनी नियोजन केले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराला रंगत आली आहे. शनिवारी प्रचार संपत असून, प्रशासनाने मतदान नोंदविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पूर्ण करण्यात येत आहेत. मतदान साहित्य रविवारी सकाळी वाटप करण्यात येणार आहे. 

यासाठी सर्व निवडणूक कार्यालयात हे साहित्य तयार ठेवण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. ज्या कर्मचाºयांना ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत त्यांना जबाबदारीचे वाटप झाले असून, प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील सखी मतदान केंद्रे 
- जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर महिला कर्मचाºयांचे राज्य असणार आहे. त्या केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. करमाळा: केंद्र क्र. ९२, नगरपालिका उर्दू मुलांची शाळा, मेनरोड करमाळा, माढा: केंद्र क्र. ८०, झेडपी प्राथमिक मुलांची शाळा क्र. १, बार्शी: केंद्र क्र. ११६, जिजामाता विद्यामंदिर, मोहोळ: केंद्र क्र. १०३, झेडपी प्राथमिक शाळा, दत्तनगर, सोलापूर शहर उत्तर: केंद्र क्र. १०३, शरदचंद्र पवार प्रशाला, उमानगर, शहर मध्य: केंद्र क्र. २८२, सेल्स टॅक्स आॅफिस, होटगी रोड, अक्कलकोट: केंद्र क्र. १४५, श्री शहाजी हायस्कूल, दक्षिण सोलापूर: केंद्र क्र. २८३, नेताजी सुभाषचंद्र प्रशाला, पंढरपूर: केंद्र क्र. ९७, द. ह. कवठेकर प्रशाला, सांगोला: केंद्र क्र. १६६, झेडपी प्राथमिक शाळा, पुजारवाडी, माळशिरस: केंद्र क्र. १३६, झेडपी प्राथमिक मुलांची शाळा क्र. १. 

वाहनांची अशी व्यवस्था
- ईव्हीएम मशीन व कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत नेणे व मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोच करण्यासाठी पुढीलप्रमाणे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. एस.टी. बस: ५२२, जीप: २२२, सेक्टर आॅफिसरसाठी जीप: ३६६, आरओ व एडीओसाठी ५० कार लागणार आहेत. सोलापूर शहर मध्य, पंढरपूर आणि सांगोला विधानसभेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम लागणार आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर ईव्हीएम: ४२२७, कंट्रोल युनिट: ५३२२ आणि व्हीव्हीपॅट: ४५७६ लागणार आहेत. १४०० च्या पुढे मतदारसंख्या असणारी ६५ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी अतिरिक्त व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहेत.

१८ हजार कर्मचारी
- ११ विधानसभा मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी १८ हजार ३१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात दिव्यांग मतदार १८ हजार १३९ इतके आहेत. त्यात चालता न येणारे १९११ मतदान केंद्रांवरील ७ हजार ३८५ मतदार आहेत. या मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर व गरज भासल्यास त्यांना घरून आणण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

पाऊस झाला तर...
- जिल्ह्यात सध्या पावसाची स्थिती आहे. पावसामुळे मतदान केंद्रावर चिखल किंवा येणाºया रस्त्यावर अडथळा निर्माण झाला तर संबंधित महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने याबाबत तत्काळ नियोजन करण्याबाबत सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. मतदानाला आणखी दोन दिवसांचा अवधी आहे. २१ आॅक्टोबर रोजी काय परिस्थिती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vote of firecrackers in the 4 constituencies will be gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.