सोलापूरातील मतदारांची आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार, ३२९० अधिकाºयांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:10 AM2017-11-08T11:10:45+5:302017-11-08T11:11:37+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार छायाचित्र यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी निर्दाेष करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मतदार नोंदणीविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत घरोघरी भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत. अधिकाºयांनी या भेटीत स्थलांतरित आणि मयत झालेल्या मतदारांची नावे वगळायची आहेत. शिवाय मतदारांचे नाव, वय, लिंग, पत्ता, फोटो यामध्येही आवश्यक त्या दुरुस्त्या करायच्या आहेत. मतदारांची, कुटुंबाची माहिती व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
------------------
आॅनलाईन अर्ज करा
च्मतदार नोंदणीची सोय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलमध्ये करण्यात आली आहे. या पोर्टलमध्ये आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतील. मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘ईआरओ एनईटी’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याद्वारे संबंधित अर्जदारांना आपला अर्ज मंजूर झाला की नाही, आपले नाव यादीत समाविष्ट झाले की नाही, याची माहिती मोबाईलवर मिळू शकते.
---------------------
महाविद्यालये, मंडळांचे सहकार्य
- मतदार नोंदणीच्या कामात सहकार्य मिळावे यासाठी तहसीलदारांमार्फत तालुक्यातील नवरात्र मंडळे, गणपती मंडळे, तरुण मंडळे यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या व १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करून घेण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि प्राचार्यांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
----------------
३२९० अधिकाºयांची नियुक्ती
- प्रारुप मतदार याद्या ३ आॅक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्र, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ३२९० मतदार यादी भाग असून प्रत्येक भागाकरिता एक याप्रमाणे ३२९० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.