मतदान, मतमोजणी कर्मचाºयांना आहार भत्ता रोखीने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:34 PM2019-10-07T14:34:35+5:302019-10-07T14:35:39+5:30

विधानसभा निववडणूक;: सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाप्रमाणे पन्नास टक्के भत्ता देण्यात येणार

The voting and counting staff will receive food allowance in cash | मतदान, मतमोजणी कर्मचाºयांना आहार भत्ता रोखीने मिळणार

मतदान, मतमोजणी कर्मचाºयांना आहार भत्ता रोखीने मिळणार

Next
ठळक मुद्दे अधिकारी व कर्मचाºयांना भत्त्याचे वाटप करणाºया व यासंबंधी वेतन पावती नोंदवहीचे काम पाहणाºया लेखा कर्मचाºयांना मतदान अधिकाºयांइतका भत्ता लागू राहीलमतदान व मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना भोजनाची पाकिटे किंवा सौम्य अल्पोपहार प्रतिदिन १५0 रुपयांच्या मर्यादेत पुरविण्यात येणार

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान व मतमोजणीसाठी काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाप्रमाणे पन्नास टक्के भत्ता देण्यात येणार आहे. 

लोकसभा, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी मतदान व मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना निवडणूक भत्ता देण्याबाबत सामान्य प्रशासन  विभागाने १८ मार्च २0१४ रोजी अध्यादेश जारी केलेला आहे. या अध्यादेशाप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी हजर राहणाºया कर्मचाºयांना भत्ते देण्यात येणार आहेत. असा भत्ता केव्हा देण्यात यावा याचेही निकष ठरविण्यात आलेले आहेत. 

प्रशिक्षणाकरिता उपस्थित राहणाºया, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाºया तसेच मतदान व मतमोजणीदिवशी प्रत्यक्ष  कर्तव्य बजावणाºया कार्यरत व   राखीव अधिकारी व कर्मचाºयांना निवडणूक भत्ता देय राहणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचाºयांना भत्त्याचे वाटप करणाºया व यासंबंधी वेतन पावती नोंदवहीचे काम पाहणाºया लेखा कर्मचाºयांना मतदान अधिकाºयांइतका भत्ता लागू राहील. 
मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना भोजनाची पाकिटे किंवा सौम्य अल्पोपहार प्रतिदिन १५0 रुपयांच्या मर्यादेत पुरविण्यात येणार आहे. अल्पोपहार पाकिटे पुरविणे शक्य न झाल्यास हा भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. 

बंदोबस्तातील कर्मचाºयांनाही भत्ता

  • - मतदान व मतमोजणीदिवशी बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, ग्रामरक्षक दल, वनरक्षक दल, एनसीसी कॅडेटस, माजी सैनिक अधिकारी व केंद्रीय निम्न लष्करी दलातील जवानांना आहार भत्ता रोखीने अदा करण्यात येईल किंवा भोजप पाकिटाची व्यवस्था केली जाईल. 
  • -  निवडणूक कामासाठी नियुक्त या सर्व कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष व मतमोजणी निरीक्षकांना देण्यात येणाºया भत्त्याइतका भत्ता देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य प्रवास व दैनिक भत्ता देण्यात येणार नाही, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले. 
  • असे आहेत भत्ते
  • - क्षेत्रिय अधिकारी व दंडाधिकारी: १५00 रुपये (एकत्रित)
  • - मतदान केंद्राध्यक्ष, मतमोजणी पर्यवेक्षक: ३५0 (प्रत्येक दिवशी)
  • - मतदान अधिकारी, मतमोजणी सहायक: २५0 (प्रत्येक दिवशी)
  • - चतुर्थश्रेणी कर्मचारी: १५0 (प्रत्येक दिवशी)
  • - भोजनाची पाकिटे : १५0 (प्रतिदिन), 
  • - फिरते व्हिडीओ पथक, निरीक्षण पथक, लेखा परीक्षण पथक, निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष, कॉल सेंटरमधील कर्मचारी, प्रसारमाध्यमांना प्रमाणपत्र देणारी यंत्रणा, फिरते पथक, स्थायी पथक, खर्च नियंत्रण सेलचे कर्मचारी, वर्ग: १ व वर्ग:२: १२00 रु. (एकत्रित एकदा) ४ वर्ग: ३: १000 (एकत्रित एकदा)
  • -  वर्ग: ४ : २00 (प्रति दिवस) ४ आयकर निरीक्षक: १२00 रु. 

Web Title: The voting and counting staff will receive food allowance in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.